राजापूर ःउपसलेल्या गाळाच्या वाहतुकीवर तोडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ःउपसलेल्या गाळाच्या वाहतुकीवर तोडगा
राजापूर ःउपसलेल्या गाळाच्या वाहतुकीवर तोडगा

राजापूर ःउपसलेल्या गाळाच्या वाहतुकीवर तोडगा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat12p10.jpg ः KOP23L74997
राजापूर ः चिरेखाण व्यावसायिक, आंबा बागायतदार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी वैशाली माने. या वेळी उपस्थित तहसीलदार शीतल जाधव, मुख्याधिकारी प्रशांत भोसले.
--------------
उपसलेल्या गाळाच्या वाहतुकीवर तोडगा
---
राजापुरात चिरेखाण व्यावसायिक, आंबा बागायतदारांसमवेत बैठक; आंबा बागायतदारही गाळ नेणार
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १२ ः पूरमुक्त राजापूर शहर होण्यामध्ये अडथळा ठरत असलेला अर्जुना-कोदवली नदीतील गाळाचा उपसा सुरू झाला आहे. मात्र, उपसेलल्या गाळाची नदीपात्रातून अद्यापही वाहतूक सुरू झालेली नाही. नदीपात्रातील गाळ वाहतुकीसाठी चिरेखाण मालक-चालक, व्यावसायिक आणि आंबा बागायतदारांनी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी वैशाली माने यांनी केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देताना गाड्या उपलब्ध करून देण्याचे चिरेखाण व्यावसायिकांनी आश्‍वासित केले तर, बागायतदारांनी बागांसाठी उपयुक्त गाळ स्वखर्चाने नेण्याचे संयुक्त बैठकीत मान्य केले.
नगर पालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृहामध्ये प्रांताधिकारी माने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला तहसीलदार शीतल जाधव, मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्यासह महेश शिवलकर, डॉ. प्रभूदेसाई, सौरभ खडपे, संदीप मालपेकर यांच्यासह चिरेखाण मालक-चालक, आंबा बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातून वाहणार्‍या अर्जुना-कोदवली नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचा संचय झाला असून तो पावसाळ्यामध्ये वारंवार येणार्‍या पुराला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे गाळाचा उपसा करण्यात नाम फाउंडेशनने पुढाकार घेतला असून त्याला महसूल विभाग आणि नगर पालिकेकडून सहकार्य केले जात आहे. या उपक्रमाला सार्‍यांकडून आपापल्यापरीने सहकार्य केले जात आहे. त्यानुसार नाम फाउंडेशनने उपलब्ध करून दिलेल्या यंत्रसामुग्रीच्या साहाय्याने उपशाचे काम सुरू झाले आहे. सद्यःस्थितीमध्ये बंदरधक्का आणि आयटीआय परिसरामध्ये उपसा करण्यात येत आहे. या गाळाची नदीपात्रातून वाहतूक न करता उपसा करून पात्रामध्ये ठेवला जात आहे. उपसा केलेला हा गाळ तसाच राहिल्यास भविष्यामध्ये पुन्हा नदीपात्रामध्ये गाळ संचय होणार आहे. त्यामुळे हा गाळ नदीपात्राशेजारी न ठेवता त्याची अन्यत्र वाहतूक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने चिरेखाण व्यावसायिक, आंबा बागायतदार यांच्यासमवेत आज बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये चर्चा करताना प्रांताधिकारी माने यांनी उपसा केलेल्या गाळाची अन्यत्र वाहतूक करण्यास सहकार्य करण्याचे आवाहन चिरेखाण व्यावसायिक, बागायतदार यांना केले. या वेळी तहसीलदार जाधव, मुख्याधिकारी भोसले यांनीही मार्गदर्शन केले.