संत चरित्राचा अभ्यास निश्चय दृढ ठेवण्यासाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत चरित्राचा अभ्यास निश्चय दृढ ठेवण्यासाठी
संत चरित्राचा अभ्यास निश्चय दृढ ठेवण्यासाठी

संत चरित्राचा अभ्यास निश्चय दृढ ठेवण्यासाठी

sakal_logo
By

rat१२२०.txt

(टुडे पान २ साठी)

शिवचरित्र कीर्तनमाला .............लोगो

संत चरित्राचा अभ्यासातून निश्चय दृढ करा

आफळेबुवा ; शिवचरित्र, संत चरित्र याची उत्तम सांगड

चिपळूण, ता. १२ ः नैराश्य आलेल्या आणि भरकटलेल्या तरुण पिढीला संत ज्ञानदेव महाराजांचे उदाहरण द्यायला हवे. समाजाकडून सतत अवहेलना सोसूनही तोच समाज सुधारण्याचा निश्चय केल्यामुळे त्यांच्या हातून ज्ञानेश्वरी निर्माण होऊ शकली. संतांच्या चरित्राचा अभ्यास आपला निश्चय दृढ ठेवण्यासाठी करायला हवा असे प्रतिपादन आफळे बुवा यानी केले. येथे श्री स्वामी चैतन्य परिवार आयोजित शिवचरित्र कीर्तनमालेच्या दुसऱ्या दिवशी श्री आफळेबुवांनी ‘निश्चयाचा महामेरू’ हा विषय विवेचनासाठी घेतला होता.

पूर्वरंगात संत नामदेव महाराजांचा ''देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ राहो'' हा अभंग होता. निश्चयाचा महामेरू आणि नामदेव महाराजांचा अभंग याचे विवेचन करताना बुवांनी संतचरित्राची उदाहरणे दिली. विविध कथांमधून निश्चयाचं बळ कसं महत्वाचं असल्याचे सांगितले. या वेळी आफळे बुवानी उत्तररंगात शिवचरित्राला सुरवात केली. त्यापुढे अफजल खान वध रंगवला. शिवचरित्र आणि संतांची चरित्र याची उत्तम सांगड बुवांनी उत्तररंगात घातली. समर्थ रामदासांचा जीवनप्रवास आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनप्रवास कसा पूरक होता याचे दाखले बुवांनी दिले. रायरेश्वर शपथ घेतल्यानंतर राजांनी जवळजवळ ४० किल्ले जिंकले. त्या खालचा सगळा मुलुख आपल्या अखत्यारित आणला. त्याच वेळेला समर्थ रामदास यांनी अकरा मारूती मंदिर आणि पूर्ण भारतभर अकराशे मठ स्थापन केले.
अफजल खान वधाआधी समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजीराजांना पाठवलेल्या पत्राचा दाखला देऊन त्या काळात त्यांचं गुप्तहेर खातं कसं काम करत होतं हे दाखवून दिलं. नुसतं जिंकणं महत्वाचं नाही तर प्रशासन महत्वाचं आहे, हे राजेंनी बरोबर ओळखलं होतं. जावळीचा मुलुख जिंकून राजांनी ११ किल्ले घेतले. अफजलखानाची स्वारी विजापुरातून निघाल्यापासून प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध होईपर्यंत राजेंनी कशी रणनीती आखली होती याचं निवेदन अत्यंत बारीकसारीक गोष्टींसह बुवांनी उत्तम केलं.
--
निश्चयाचा महामेरू
प्रत्यक्ष अफजल खान वध हा अत्यंत आवेशपूर्ण पोवाड्यातून सादर करताना तो प्रसंग सर्व श्रोत्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. अफजल वध झाला म्हणून जल्लोष करत न राहता विजापूरपर्यंतच्या मुलखावर भगवा ध्वज फडकवण्यासाठी राजे प्रतापगडावरून बाहेर पडले. हाच तो निश्चयाचा महामेरू आणि संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे देह जावो अथवा राहो... आपल्या कार्यासाठी कटिबद्ध असणं हे राजांच्या चरित्रावरून दिसून येतं, असं बुवांनी सांगितले.