खेड ः कशेडी घाट मृत्यूचा सापळा, 7 ठिकाण ''ब्लॅक स्पॉट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः कशेडी घाट मृत्यूचा सापळा, 7 ठिकाण ''ब्लॅक स्पॉट
खेड ः कशेडी घाट मृत्यूचा सापळा, 7 ठिकाण ''ब्लॅक स्पॉट

खेड ः कशेडी घाट मृत्यूचा सापळा, 7 ठिकाण ''ब्लॅक स्पॉट

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१२p१२.jpg ः KOP२३L७५०१०
खेड ः कशेडी घाटातील अवघड वळण.
------------
कशेडी घाटात १३ किमीमध्ये ७ ब्लॅकस्पॉट
पोलिस, महामार्गकडून पाहणी ; अवजड वाहनाना सर्वाधिक धोका
खेड, ता. १२ ः मुंबई-गोवा महामार्गावरील कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा कशेडी घाट मृत्यूचा सापळा बनला आहे. जीवघेणी वळणे आणि अरुंद व धोकादायक रस्ते तसेच तीव्र उतार आणि खोल दरी यासह रस्त्याच्या विशिष्ट पद्धतीमुळे भीषण अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. गेल्या १५ दिवसात ८ मोठे अपघात झाले आहेत. महामार्ग पोलिस आणि महामार्ग बांधकाम विभागाने १३ किलोमीटरमध्ये ७ ठिकाणांना ब्लॅकस्पॉट म्हणून घोषित केले. त्याआधी महामार्ग पोलिस आणि महामार्ग बांधकाम विभागाने कशेडी घाटाची पाहणी करून हा निर्णय घेतला आहे.
कशेडी आंबा या ठिकाणचे नागमोडी वळण हे अपघात प्रवण क्षेत्र आहे. याच वळणावर अनेक अपघात आजपर्यंत झाले आहेत आणि असंख्य लोकांना याच नागमोडी वळणावर जीव गमवावा लागला आहे. तीव्र उतार आणि अवघड वळण या कारणामुळे हे ठिकाण अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. हे ठिकाण गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जात असताना कशेडी आंबा या ठिकाणी पहिलेच ठिकाण आहे. या ठिकाणी आत्तापर्यंत
अनेक अवजड वाहनांना अपघात झाला आहे. अनेक लहान गाड्यांचादेखील भीषण अपघात झाला आहे. कशेडी घाटातील दुसरे अवघड वळण म्हणून कशेडी चेकपोस्ट उतरल्यानंतर लागणारे पहिले अवघड वळण आहे. कशेडी घाटातील सर्वात मोठा यू टर्न असलेले दुसरे अपघातप्रवण क्षेत्र तसेच ब्लॅकस्पॉट म्हणून हे घोषित करण्यात आले आहे. याचठिकाणाहून अनेक वाहने दरीत कोसळून जीवितहानी झाली आहे. कशेडी घाट चढल्यानंतर पोलादपूरच्या दिशेला असणारे ठिकाण पोलादपूरनजीक असून सतत खचणारा रस्ता आणि होणाऱ्या भूस्खलनामुळे या ठिकाणी अत्यंत खराब रस्ता असणारे हे ठिकाण आहे. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी असणाऱ्या या ठिकाणी आतापर्यंत अनेक अपघात झाले असून, या ठिकाणालादेखील प्रमुख अपघातप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे.
----------------
चौकट
रायगड हद्दीत ३ ब्लॅकस्पॉट
पोलादपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील कशेडी घाटात ३ ब्लॅकस्पॉट आहेत. गेल्या आठवडाभरात आठ अपघात त्या ठिकाणी झाले आहेत; मात्र अद्यापि या घाटात ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने घाट मृत्यूचा सापळा ठरत आहे.
----------
चौकट
अनेकवेळा पत्रव्यवहार
या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात गेल्या सहा महिन्यात अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे; परंतु संबंधित विभाग याकडे कानाडोळा करत आहे. गेल्या दोन-तीन वर्षात या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. अशी माहिती समेल सुर्वे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक -वाहतूक शाखा (कशेडी पोलिस ठाणे) यांनी दिली.