
वारगाव ग्रामपंचायत सदस्य एकनाथ कोकाटे यांचा राजीनामा
kan१२२.jpg
७५०२१
एकनाथ कोकाटे
वारगाव ग्रामपंचायत सदस्य
एकनाथ कोकाटे यांचा राजीनामा
खारेपाटण सोसायटी संचालकपदही तडकाफडकी सोडले
खारेपाटण, ता. १२ : वारगाव ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य एकनाथ कोकाटे यांनी आपल्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर खारेपाटण सोसायटी संचालक पदाचाही त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
एकनाथ कोकाटे हे भाजप कार्यकर्ते तथा कट्टर राणे समर्थक म्हणून ओळखले जातात. ते गेली २५ वर्षापासून अधिक काळ राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. वारगाव ग्रामपंचायत मध्ये त्यांनी ५ वर्षे सरपंच तर १२ वर्षे उपसरपंच म्हणून काम केले आहे. तर खारेपाटण गट विकास विविध कार्यकारी सेवा सोसायटी मध्ये गेली १५ वर्षे ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले होते.