तळवडे-म्हाळाईवाडीतील रक्तदान शिबिराला प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळवडे-म्हाळाईवाडीतील रक्तदान शिबिराला प्रतिसाद
तळवडे-म्हाळाईवाडीतील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

तळवडे-म्हाळाईवाडीतील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

sakal_logo
By

swt१२१९.jpg
७५०४३
तळवडेः म्हाळाईवाडी येथील आरोग्य उपकेंद्रात रक्तदान शिबिराचे दिपप्रज्वलन करुन उद्घाटन करताना डॉ. डी. पी. गावडे.

तळवडे-म्हाळाईवाडीतील
रक्तदान शिबिराला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १२ः तळवडे-म्हाळाईवाडी येथील आरोग्य उपकेंद्रात आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबीरात तब्बल ६४ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
श्री म्हाळाईदेवी कला-क्रीडा मित्रमंडळ, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सावंतवाडी यांच्यावतीने लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन डॉ. डी. पी. गावडे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, जेष्ठ नागरिक दादा आगारवडेकर, श्री म्हाळाईदेवी कला-क्रीडा मित्रमंडळाचे सल्लागार प्रसाद गावडे, अध्यक्ष प्रविण लोके, उपाध्यक्ष शैलेश हरमलकर, सचिव सुशांत गावडे, खजिनदार भरत गावडे, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य एकनाथ चव्हाण, सावंतवाडी तालुका खजिनदार सिद्धार्थ पराडकर, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे शशांक विचारे, कोल्हापूर येथील वैभवलक्ष्मी रक्तपेढीचे संचालक धनंजय साळोखे आदी उपस्थित होते. वैभवलक्ष्मी रक्तपेढीचे संचालक धनंजय साळोखे यांनी श्री म्हाळाईदेवी कला-क्रीडा मित्रमंडळाने रक्त संकलनासाठी निमंत्रित केल्याबद्दल मंडळाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. रक्ताची गरज भासल्यास आम्हाला हाक मारा, आम्ही सदैव आपणास सहकार्यासाठी सदैव तत्पर राहू, असे अभिवचन दिले. यावेळी आरोग्य सेविका संगिता नाईक, आरोग्य सेवक सागर केरकर तसेच मंडळाचे विकास गावडे, राकेश हरमलकर, प्रितम मालवणकर, महेश लोके, शाम हरमलकर, संजु आचरेकर, प्रवीण नागवेकर, सुष्मा गावडे, रुक्मिणी गावडे आदी उपस्थित होते.