पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत

sakal_logo
By

rat१२२८.txt

(पान २ साठी)

फोटो ओळी
-rat१२p१६.jpg-
७५०२२
रत्नागिरी ः शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना पूजा ओसवाल. सोबत नरेंद्र पाटील, अनिल चव्हाण, दीपा सावंत आणि सुवर्णा सावंत.
----
जांभेकर विद्यालयाचे तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत

रत्नागिरी, ता. १२ ः येथील सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुयश संपादन केले. यामध्ये सूरज खेत्री, आर्य पवार, आर्यन चव्हाण या तीन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावून गेली अनेक वर्ष हुलकावणी देत असलेल्या यशाला गवसणी घातली. या विद्यार्थ्यांचा नुकताच विद्यालयामध्ये रत्नागिरी माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी डाएटच्या अधिव्याख्याता व विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी दीपा सावंत, शांती फाउंडेशनच्या पूजा ओसवाल, श्रीमती महिंद्रे, विद्यालयाचे माजी शिक्षक नरेंद्र पाटील, मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक अनिल गार्डी उपस्थित होते. मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. शिक्षणाधिकारी सावंत यांनी विद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक स्तर लक्षात घेता विद्यालयाने मेहनतपूर्वक मिळवलेले हे यश कौतुकास्पद असल्याचा उल्लेख केला. मुख्याध्यापक चव्हाण हे उपक्रमशील मुख्याध्यापक असल्याचे सांगून शिक्षण विभागाने कोणतीही कामगिरी विद्यालयाला सांगितली असता त्याला नेहमी सकारात्मक प्रतिसाद मिळतो, असे सांगितले.
शिक्षकांनी नियोजनबद्ध अथक परिश्रम घेतले. याबद्दल मुख्याध्यापक चव्हाण, शिक्षिका संजना तारी, अस्मिता फाटक, शुभांगी अभ्यंकर, दिव्यता नागवेकर आणि भाग्यश्री रायकर यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. अधिव्याख्याता दीपा सावंत यांनी विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते पूर्वीप्रमाणेच असल्याचा व विद्यालयातील संस्कार आणि शिक्षण याचा पुरेपूर फायदा विद्यार्थ्यांना होत असल्याचा उल्लेख स्वतःचा दाखला देऊन केला. माजी विद्यार्थी व मैत्री ग्रुपतर्फे ३ हजार रुपये विद्यार्थ्यांना पारितोषिक स्वरूपात आणि १८ हजार रुपये ठेव स्वरूपात दिले. नरेंद्र पाटील यांनी १० हजार रुपये ठेव स्वरूपात दिले. मार्गदर्शक शिक्षक, लिपिक, शांती फाउंडेशनच्या पूजा ओसवाल यांनी विविध भेटवस्तू देऊन शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना गौरवले.