वेताळ प्रतिष्ठानचे कार्य भूषणावह

वेताळ प्रतिष्ठानचे कार्य भूषणावह

Published on

75092
वेंगुर्ले ः मानाचा श्री वेताळ करंडक न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा यांना प्रदान करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी. शेजारी उद्योजक दादासाहेब परुळकर आदी.

वेताळ प्रतिष्ठानचे कार्य भूषणावह

मनिष दळवी ः अश्वमेध महोत्सवाच्या विविध स्पर्धांमधील बक्षिसांचे वितरण

वेंगुर्ले, ता. १२ ः जिल्ह्यात कला, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि गेल्या काही वर्षांमध्ये कोकणची लोकपरंपरा असणाऱ्या दशावतार या सर्वांना व्यासपीठ देण्याचे काम वेताळ प्रतिष्ठान सलग नऊ वर्षे करत आहे. प्रतिष्ठानचे कार्य सिंधुदुर्गासाठी खऱ्या अर्थाने भूषण आहे, असे गौवोद्गार अश्वमेध महोत्सव अंतर्गत स्पर्धात्मक उपक्रमांच्या बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी काढले.
सलग पंधरा दिवस चाललेल्या या अश्वमेध महोत्सवाअंतर्गत अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. तुळस महोत्सव अंतर्गत दशावतार नाट्यमहोत्सवाला रसिक प्रेक्षकांची गर्दी होती. नाट्य महोत्सवाची सुरुवात दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळ सिंधुदूर्ग यांनी ‘शेषाद्मज गणेश’ तर आजगावकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘त्रिवेणी संगम’ आणि देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘गौरी स्वयंवर’ या नाटकांनी दशावतार नाट्य महोत्सवाची उंची वाढवण्याचे काम केले.
जिल्ह्यातील शालेय मुलांना व्यासपीठ देण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. उद्‍घाटन जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि गणेश पूजन करुन करण्यात आले. यावेळी व्यापीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक दादासाहेब परुळकर, प्रमुख अतिथी जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, उद्योजक सुधीर झांटये, पंच सदस्य जयंत तुळसकर, निलेश नागवेकर, उपसरपंच सचिन नाईक, ज्येष्ठ दशावतार श्रीधर मुळीक, प्रगतशील शेतकरी शरद धुरी, आदर्श शिक्षक झिलू घाडी व शिक्षिका लीना नाईक, सिंधु रक्तमित्रचे जिल्हाध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, साहस प्रतिष्ठानच्या रुपाली पाटील, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर, निवेदक काका सावंत, बी. टी. खडपकर, मंदार तुळसकर, प्रकाश परब, कृष्णा तावडे, सुजाता पडवळ आदी होते. सांस्कृतिक महोत्सवामध्ये विविध स्पर्धा झाल्या. यामध्ये जिल्ह्यातील २५ हून अधिक शाळांनी सहभाग घेतला. हायस्कूलसाठी आयोजित विविध स्पर्धांमधून सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्याला ‘न्यू इंग्लिश मिडीयम स्कूल उभादांडा’ ला मानाचा ‘श्री वेताळ करंडक’ मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. शालेय समूहगीत गायन स्पर्धेचे परीक्षण वीणा दळवी आणि रुपेंद्र परब, शालेय स्पर्धांचे परीक्षण रवी कुडाळकर, तुळशीदास आर्लेकर, ओंकार परब यांनी केले. प्रा. सचिन परुळकर यांनी सूत्रसंचालन केले. गुरुदास तिरोडकर यांनी आभार मानले.
--
स्पर्धांचा अनुक्रमे निकाल असा
प्राथमिक शाळा समूहनृत्य स्पर्धा ः एम. एम. परुळेकर शाळा, मालवण, श्री जैतीर विद्यालय तुळस, श्री वेताळ विद्यामंदिर, तुळस, प्रि. एम. आर. देसाई इंग्लिश स्कूल, वेंगुर्ला. प्रशालांसाठी लावणी नृत्य स्पर्धा ः मिलाग्रिस हायस्कूल, सावंतवाडी, जि. प. शाळा वेंगुर्ला नं.१, श्री जनता विद्यालय तळवडे. प्रशालांसाठी दशावतार एकपात्री साभिनय स्पर्धा ः वीर गावडे (न्यू इंग्लिश स्कूल,उभादांडा), जयेश सोनुर्लेकर (वेंगुर्ला हायस्कूल), कश्मिरा मांजरेकर (मदर तेरेसा इंग्लिश स्कूल वेंगुर्ला).
---
इतर काही स्पर्धांचा निकाल
प्रशालांसाठी समूहनृत्य स्पर्धा ः न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा, प्रि. एम. आर देसाई स्कुल, वेंगुर्ला, मळेवाड हायस्कूल. जोडी नृत्य स्पर्धा ः न्यु इंग्लीश स्कुल, उभादांडा, नेमळे हायस्कुल, प्रि. एम. आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कूल वेंगुर्ला. प्रशालांसाठी समूहगीत गायन स्पर्धा ः जि. प. शाळा तेंडोली नं. १, न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा, वेंगुर्ला, श्री वेताळ विद्यामंदिर, तुळस. प्रशालासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा ः न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा, प्रिं. एम. आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कूल वेंगुर्ला, श्री जनता विद्यालय तळवडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com