एसटी चालक दीपक गेल्येंची वृद्धाला मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी चालक दीपक गेल्येंची वृद्धाला मदत
एसटी चालक दीपक गेल्येंची वृद्धाला मदत

एसटी चालक दीपक गेल्येंची वृद्धाला मदत

sakal_logo
By

rat१२२१.txt

( पान २)

काही सुखद--लोगो

एसटी चालक दीपक गेल्येंची वृद्धाला मदत

साडवली, ता. १२ ः एसटी सुरक्षा पंधरवड्यात चालक दीपक गेल्येंनी माणुसकी दाखवत डोळ्याने कमी दिसत असलेल्या आजोबाना मदत केली. त्यांच्या या कृत्याचे प्रवाशानी कौतूक केले.
देवरूख एसटी आगारातून गुरुवारी दुपारी १२ वा. देवरूख-रत्नागिरी बस सुटली. या बसमध्ये एक वृद्ध प्रवाशी पहिल्या सीटवर बसले होते. त्यांनी पाटगावचे तिकीट काढले होते; मात्र सावरकर चौकात प्रवाशी घेण्यासाठी गाडी थांबली असता हे वृद्घ गृहस्थ पाटगाव आले असे समजून उतरू लागले. ही गोष्ट वाहकांच्या लक्षात आली. त्यांनी आजोबा पाटगाव आले की, तुम्हाला सांगतो असे बोलून ते तिकिटासाठी मागे गेले. पाटगाव येताच गाडी थांबली व ते गृहस्थ उतरू लागले; पण ते चाचपडत होते. ही बाब चालक गेल्ये यांच्या लक्षात आले. त्यांनी गाडीतून उतरून या आजोबांना धरून खाली उतरवले व विचारपूस केली तेव्हा या आजोबांच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन झाल्याने मला काही दिसत नाही, असे सांगितले. यावर सगळ्यांनाच धक्का बसला. गेल्ये यांनी स्टॉपवरील पानपट्टीत त्यांना खुर्चीत बसवले व मालकांना आजोबांची स्थिती सांगून त्यांना घरी सोडण्याची विनंती केली व पुढील प्रवासासाठी बस रवाना झाली. गेल्ये यांनी माणुसकी जपत प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य खरे करून दाखवले. बुधवारी सकाळी ११ वा. सडकसुरक्षा पंधरवडा जागृती कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या वेळी चालक-वाहकांनी सुरक्षित सेवा द्यावी, असे सांगितले गेले होते आणि दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली.
--