
सातोळीतील दिव्यांग चिमुरडीला व्हीलचेअर
swt१२३०.jpg
७५०९४
सावंतवाडी : चिमुरडीला व्हिलचेअर देताना ''सामाजिक बांधिलकी''ची टीम.
सातोळीतील दिव्यांगांना व्हीलचेअर
सावंतवाडीः सातोळी येथील १४ वर्षीय ''पुण्याई'' ही चिमुरडी उभी राहण्यासाठी ''सामाजिक बांधिलकी''ने पाठपुरावा करून तिला आवश्यक असलेली व्हीलचेअर उपलब्ध करून दिली. यासाठी सावंतवाडीच्या माजी नगरसेविका कीर्ती बोंद्रे व त्यांचे पती किशोर बोंद्रे यांनी पुढाकार घेतला. आज आकाशवाणी केंद्राच्या निवेदिका अनघा मोडक यांच्या हस्ते ही चेअर तिला प्रदान करण्यात आली. यावेळी सामाजिक बांधिलकी संघटनेचे अनिल परुळेकर, संजय पेडणेकर, रवी जाधव, माजी प्रा. सतीश बागवे, समीरा खलील, हेलन निब्रे, रुपाली मुद्राळे, प्रा. रुपेश पाटील, माजी प्रा. गोवेकर, ज्येष्ठ पत्रकार संतोष सावंत, प्रवीण सूर्यवंशी, विदेश सावंत, साहस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा रुपाली पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कदम आदी उपस्थित होते.
...............
swt१२३१.jpg
75095
डेरवणः शालेय टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त येथील मुलींचा संघ.
मालवणच्या मुलींना टेबल टेनिसमध्ये कांस्य
मालवण : डेरवण येथे काल (ता. ११) झालेल्या राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेत येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या १४ वर्षांखालील गटामध्ये आर्या दिघे, प्राची चव्हाण, वर्षा परुळेकर, सावली मोरजकर या मुलींच्या संघाने कांस्यपदक पटकावले. यशस्वी विद्यार्थिनींना मालवण टेबल टेनिस अॅकॅडमीच्या विष्णू कोरगावकर, सुजन परब यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे मालवण एज्युकेशन सोसायटी आणि जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक वर्ग तसेच महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन सिंधुदुर्गचे सचिव हेमंत वालकर यांनी अभिनंदन केले.
.................