सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वसामान्यांची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वसामान्यांची
सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वसामान्यांची

सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वसामान्यांची

sakal_logo
By

swt1236.jpg
75120
आचराः ठेवीदारांना ठेवपावत्या वितरीत करताना माजी खासदार नीलेश राणे. सोबत मनीष दळवी व अन्य.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक सर्वसामान्यांची
नीलेश राणेः आचरा शाखेचे नव्या वास्तूत स्थलांतरण
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. १२ः सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्यांची बँक आहे. बँकेच्या ठेवी, उलाढाल यात सातत्याने वाढ होऊन बँकेच्या माध्यमातून जिल्हावासीयांची भरभराट झाली पाहिजे. सिंधुदुर्ग बँक चांगले काम करत असून महाराष्ट्रात मोठा मान सन्मान जिल्हा बँक अध्यक्षांना आहे. जिल्हा बँकेच्या आचरेसारख्या ग्रामीण भागातील एका शाखेची उलाढाल ४८ कोटी असणे हा जनतेचा विश्वास आहे. अधिकारी, कर्मचारी यांची तत्पर सेवा आहे, असे कौतुकोद्गार माजी खासदार नीलेश राणे यांनी आचरा येथे काढले.
सिंधुदुर्ग बँक आचरा शाखा नव्या वास्तूत स्थलांतरित झाली. त्याप्रसंगी राणे यांनी उपस्थित राहत शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, संचालक बाबा परब, भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, मालवण भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, संतोष कोद, नीलिमा सावंत, जेरान फर्नांडिस, माजी उपसभापती राजू परुळेकर, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाध्यक्ष महेश राणे, अवधूत हळदणकर, मनोज हडकर प्रकाश मेस्त्री, चिंदर सोसायटी चेअरमन देवेंद्र हडकर, प्रफुल्ल प्रभू आदी उपस्थित होते.
जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांनी, ज्यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग बँक होती त्यावेळेपासून आचरा येथे बँक शाखा सुरू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीचे दरडोई उत्पन्न वाढविण्याचे स्वप्न साकार करण्यात बँकेचा खारीचा वाटा आहे. जिल्हा बँकेच्या आचरा शाखेची उलाढाल ४८ कोटीपर्यंत गेली आहे, असे सांगून या आर्थिक वर्षात ती ५० कोटीपर्यंत वाढविण्यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही केले. जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी आचरा गाव देवस्थान इनाम असल्याने कर्ज प्रकरण करताना अडचणी निर्माण होत असल्याची बाब दळवी यांच्या समोर मांडल्या.
यावेळी माजी खासदार राणे यांच्या हस्ते नवीन ठेवीदारांना ठेवपावत्या वितरीत करण्यात आल्या. तसेच पंचक्रोशीतील सोसायटी चेअरमनांचा सत्कार राणे, दळवींच्या हस्ते करण्यात आला. राजन गावकर, संतोष कोद, नीलिमा सावंत, जेरान फर्नांडिस, माजी उपसभापती राजू परुळेकर, बाळासाहेबांची शिवसेना तालुकाध्यक्ष महेश राणे, अवधूत हळदणकर, मनोज हडकर, प्रकाश मेस्त्री आदी उपस्थित होते.