
चिन्हावर शिक्का मारून मतदान हवे
rat१२३४.txt
(पान ३ साठी)
मतपत्रिकेवर शिक्का मारून मतदान घ्या
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; अशिक्षितांची गैरसोय दूर करा
रत्नागिरी, ता. १२ ः आगामी निवडणुकांसाठी होणाऱ्या मतदानामध्ये आपण मतदान मशिनचा वापर करणार आहोत. यामध्ये अशिक्षित लोकांची प्रचंड गैरसोय होते. काहीवेळा मशिनमध्ये बिघाड होतो. त्यामुळे पूर्वीप्रमाणे जे चिन्हावर शिक्का मारून मतदान होत होते, तीच पद्धत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करणारे नाझीम झारी यांच्यासह ३२ नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
निवेदनात असे म्हटले आहे, की अनेक वर्षे अनेक अर्जाबाबत प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक विभागाकडे तक्रारी अर्ज दिलेले होते. त्याप्रमाणे कामे होत आली आहेत. अलिकडेच रत्नागिरी शहरातील महागाई तसेच मोजकी स्वच्छतागृहे, बाथरूम, रस्त्याची कामे रखडलेली आहेत. ती कामे पूर्णत्वास नेण्याची गरज आहे. मी एक नागरिक असून, फळविक्रेत्यांच्या समस्या या पूर्वी मिटवलेल्या आहेत. त्याप्रमाणे मी प्रत्येक ठिकाणी अर्ज दिले होते. तसेच आगामी होणाऱ्या मतदानामध्ये आपण मतदान करताना मशिनचा वापर होणार आहे. त्यामुळे अशिक्षित लोकांची गैरसोय होते. काहीवेळा मशिनमध्ये बिघाड होतो. मतदान बरोबर होत नाही त्यामुळे असे वाटते की, आपले पूर्वी जे चिन्हावर शिक्के मारून मतदान होत होते तीच पद्धत बरोबर असून तीच पद्धत पुन्हा सुरू करावी, अशी आमची मागणी आहे. तरी या मागणीचा विचार व्हावा,अशी मागणी केली आहे.