पूररेषा बाहेर 5 किमीपर्यंत मोफत गाळ मिळणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूररेषा बाहेर 5 किमीपर्यंत मोफत गाळ मिळणार
पूररेषा बाहेर 5 किमीपर्यंत मोफत गाळ मिळणार

पूररेषा बाहेर 5 किमीपर्यंत मोफत गाळ मिळणार

sakal_logo
By

rat१२४०.txt

(पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat१२p२४.jpg ः
७५११५
चिपळूण ः बैठकीत मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी प्रवीण पवार.
--

पूररेषेबाहेर ५ कि.मी.पर्यंत वाशिष्ठीतील गाळ मोफत

चिपळुणात निर्णय ; संयुक्तपणे होणार उपशाची पाहणी

चिपळूण, ता. १२ ः वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्याबाबत प्राताधिकाऱ्‍यांनी पंचायत समितीत संयुक्त बैठक घेतली. वाशिष्ठी नदीतील गाळ काढताना कुणी मागणी केली आणि त्याला महसूल विभागाने परवानगी दिल्यास जलसंपदा आपल्या टिपरच्या माध्यमातून खासगी जागेत गाळ टाकणार आहे. पूररेषेबाहेर ५ किमीपर्यंत मोफत गाळ मिळणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी गुरुवारी येथील बैठकीत दिली. बचाव समिती आणि अधिकारी संयुक्तपणे गाळ उपशाची पाहणी करण्याचेही बैठकीत ठरले.

पंचायत समितीच्या सभागृहात आज प्रांताधिकारी पवार, जलसंपदाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता काझी, तहसीलदार तानाजी शेजाळ, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत गाळ उपशाचे नियोजन आणि कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. वाशिष्ठी नदीतील पहिल्या टप्प्यातील गाळ आतापर्यंत ३७ हजार घनमीटर इतका काढण्यात आला. उर्वरित उपसा हा जागा उपलब्ध नसल्याने थांबला असल्याचे सांगण्यात आले; मात्र यावर गेल्याच महिन्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या झालेल्या बैठकीत निर्णय झाला आहे. काढलेला गाळ स्वखर्चाने वाहून नेण्यास परवडत नसल्याने कुणीच पुढे येत नाही. यावर जलसंपदा विभाग स्वताच्या टिपरच्या माध्यमातून काढलेला गाळ पूररेषेच्या बाहेर खासगी जागेत पोहच करणार असल्याचे प्रांताधिकारी पवार यांनी सांगितले.
या बैठकीत बचाव समितीचे अरुण भोजने यांनी बाजारपूल, बहादूरशेखनाका येथील जुना पूल तोडण्याबरोबरच गाळ उपसा आणि त्याबाबत होत चाललेले दुर्लक्ष याबाबत प्रश्न उपस्थित केले. या वेळी बचाव समितीचे बापू काणे, किशोर रेडीज, उदय ओतारी, महेंद्र कासेकर, रामशेठ रेडीज, शाहनवाज शाह यांच्यासह प्रसाद चिपळूणकर, साईनाथ कपडेकर आदी उपस्थित होते.
---
बांधणांसंदर्भात प्रश्न उपस्थित
मल्हार इंदुलकर यांनी गाळ उपसा करताना आदिवासी बांधवांचे उद्ध्वस्त झालेल्या बांधणांसंदर्भात प्रश्न उपस्थित केला. याबाबत नुकसानीचा प्रस्ताव आदिवासी विकासखात्याच्या पेण कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे. शिवाय बांधण आणि त्याबाबतची माहिती जलसंपदा खात्याला देण्यासंदर्भातही सूचना केल्या आहेत
प्रांताधिकारी प्रवीण पवार