आई आणि शाळेमुळेच आयुष्यात प्रगती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आई आणि शाळेमुळेच आयुष्यात प्रगती
आई आणि शाळेमुळेच आयुष्यात प्रगती

आई आणि शाळेमुळेच आयुष्यात प्रगती

sakal_logo
By

rat१३३१.txt

बातमी क्र..३१ (टुडे पान २ साठी )

फोटो ओळी
-rat१३p१९.jpg ः
७५२४८
राजापूर ः दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा आरंभ करताना डॉ. गिरीष ओक.
--

शाळा, आईमुळेच आयुष्यात प्रगती

डॉ. गिरीश ओक ; माडबन शाळेचा शताब्दी महोत्सव उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः आयुष्यात आपण जी काही प्रगती करतो त्यामध्ये आई आणि शाळा या दोघींच्याही संस्काराचा मोठा वाटा असतो. त्यामुळे या दोघींच्याही ऋणातून आपण कधी मुक्त होऊ शकत नाही. त्याची आठवण ठेवत आपण शताब्दी महोत्सव साजरा करत आहात ही खूप आनंदाची गोष्ट आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. गिरीश ओक यांनी माडबन येथे काढले.

तालुक्यातील माडबन येथील जिल्हा परिषद शाळेचा नुकताच शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. ओक बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नाटककार आणि वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर, आमदार राजन साळवी, प्रसिद्ध मूर्तिकार अजिंक्य चौलकर, स्ट्राँगेस्ट वुमन ऑफ आशिया अनुजा तेंडुलकर, गटविकास अधिकारी सुहास पंडित, गटशिक्षणाधिकारी सखाराम कडू, राहुल वाघधरे, सरपंच संजय साखरकर, श्यामसुंदर गवाणकर आदी उपस्थित होते.

गंगाराम गवाणकर यांनी आपण या शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचे स्पष्ट करत शालेय जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला. साऱ्‍यांच्या साथीने आपल्याला हा प्रशालेचा शतकोत्सव महोत्सव साजरा करता येतोय त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. प्रशालेच्या वतीने सर्व मान्यवर आणि शाळेमध्ये शिकत असलेल्या सर्व मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे भेटवस्तू देऊन स्वागत आणि सत्कार करण्यात आला.