रत्नागिरी ः आता गावातच होणार पाण्याची रासायनिक तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः आता गावातच होणार पाण्याची रासायनिक तपासणी
रत्नागिरी ः आता गावातच होणार पाण्याची रासायनिक तपासणी

रत्नागिरी ः आता गावातच होणार पाण्याची रासायनिक तपासणी

sakal_logo
By

गावातच होणार पाण्याची रासायनिक तपासणी
८४६ ग्रामपंचायतींना कीटचे वितरण ; पाच महिला करणार तपासणी
रत्नागिरी, ता. १३ ः ‘जलजीवन मिशन'' कार्यक्रम मोहिमेंतर्गत जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी गावातल्या गावात होणार आहे. रासायनिक कीट जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आली असल्याचे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजार यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ‘जलजीवन मिशन'' अभियान राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत हर घर नलसे जलप्रमाणे प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतीदिन, गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे जलजीवन मिशनचे उद्दिष्ट्य आहे. या कार्यक्रमांतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण राबवण्यात येत आहे. यामध्ये गावस्तरावर रासायनिक ‘फिल्ड टेस्ट कीट'' च्या साहाय्याने जलसुरक्षक व महसूल गावनिहाय निवडण्यात आलेल्या पाच महिलांद्वारे पिण्याच्या पाण्याची तपासणी होणार आहे.
पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत रासायनिक फिल्ड टेस्ट कीटच्या गावस्तरावरील प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर प्रशिक्षकांचे प्रशिक्षण या सदराखाली तालुक्यातील सर्व आरोग्यसेवक, पाणी व स्वच्छता विभागातील गट संसाधन केंद्रातील कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने त्यांनी तालुकास्तरावरील सर्व जलसुरक्षक व महसूल गावनिहाय पाच महिला प्रतिनिधींना कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्याच्यादृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र, गट व समूह स्तरावर प्रशिक्षणांचे नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानंतर प्रशिक्षण पार पडल्यानंतर संबंधित जलसुरक्षक व पाच महिलांनी महसूल गावनिहाय शाळा व अंगणवाडी, शासकीय इमारती व कुटुंबस्तरावरील वितरण बिंदूंपासून पाण्याची तपासणी करून त्याची नोंद ‘डब्लूक्यूएमआयएस'' या केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर करणे अपेक्षित आहे.

पाण्याचा दर्जा कळणार
पिण्याच्या पाण्याची रासायनिक तपासणी गावातल्या गावात होणार आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, त्यामध्ये प्रमाणित असणारे रासायनिक घटक हे पिण्यास योग्य प्रमाणात आहेत अथवा अयोग्य हे या रासायनिक फिल्ड टेस्ट कीटद्वारे गावाला कळण्यास मदत होईल. यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तसेच त्यामध्ये प्रमाणित असणारे रासायनिक घटक हे पिण्यास योग्य प्रमाणात आहेत अथवा अयोग्य हे या रासायनिक ‘फिल्ड टेस्ट कीट''द्वारे गावाला कळणार आहे.