लांजा-लांजात शिवशाही सहकार पॅनेलला सहकार पॅनेलचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लांजा-लांजात शिवशाही सहकार पॅनेलला सहकार पॅनेलचे आव्हान
लांजा-लांजात शिवशाही सहकार पॅनेलला सहकार पॅनेलचे आव्हान

लांजा-लांजात शिवशाही सहकार पॅनेलला सहकार पॅनेलचे आव्हान

sakal_logo
By

शिवशाही पॅनेलला ‘सहकार’चे आव्हान
लांजा खरेदी-विक्री संघ निवडणूक ; १७ जागांसाठी मतदान, सामंत-साळवी आमनेसामने
सकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. १३ ः लांजा तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या शिवशाही सहकार पॅनेलच्या विरोधात भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिंदे गट यांनी एकत्र येत सहकार पॅनलची निवडणूक लढवली जात आहे. या पॅनेलमध्ये सरळ दुरंगी लढत होणार आहे. कोरोनामुळे सात वर्षानंतर निवडणूक होत असून दोन्ही पॅनेलने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाविरोधात सर्वपक्षीय सहकार पॅनल उभे ठाकले असल्याने अधिकच रंगत वाढणार आहे. एकूण १७ जागांसाठी ही निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. सहकार पॅनेलचे प्रमुख उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हा बॅंकेचे संचालक अजित यशवंतराव, मुन्ना खामकर व शिंदेगटाचे राजू कुरूप यांनी या वेळी कोणत्याही परिस्थितीत संघावर सहकार पॅनलचे वर्चस्व राहिले पाहिजे यासाठी कंबर कसली आहे. शिवसेना शिवशाही सहकार पॅनेलचे संघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आमदार राजन साळवी यांनी जोरकसपणे प्रयत्न सुरू केले आहेत. दोन्ही पॅनेलमधून तुल्यबळ उमेदवार असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.
दर पाच वर्षांनी होणारी निवडणूक कोरोनाकाळात वाढ मिळाल्यामुळे सात वर्षांनी ही निवडणूक होत आहे. १७ जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. मतदारांना प्रत्यक्ष भेटून मतदान करण्याची विनवणी उमेदवारांकडून केली जात आहे.
सर्वपक्षीय सहकार पॅनलमधून संस्था मतदार संघातून रवींद्र खामकर, चंद्रकांत मांडवकर, शैलेश घाग, स्मिता दळवी, पद्माकर भागवत, पांडुरंग दाभोळकर, सुनील पेडणेकर, विकास मांडवकर, सुरेंद्र खामकर, दीप्ती कदम, व्यक्तिगत सभासद मतदारसंघातून विकास चव्हाण, नुरुद्दीन सय्यद, इतर मागासवर्ग प्रवर्ग मतदार संघातून गुरूप्रसाद तेली, भटक्या विमुक्त अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून महेंद्र शेडे, अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून संजय कांबळे, महिला राखीव प्रतिनिधी मतदारसंघातून धनिता चव्हाण आणि स्वप्ना सावंत, शिवशाहीर सहकार पॅनेलमधून प्रवेश घारे, राहुल शिंदे, चंद्रकांत मणचेकर, सुरेश साळवी, सुभाष लाखण, सुभाष पवार, विश्वास मांडवकर, शरद चरकरी, मोहन घडशी, महादेव खानविलकर, चंद्रशेखर तेडुळकर, केशव कुपटे, उमेश लोटणकर, संतोष बेनकर, सायली तोडकरी, तेजस्विनी शेट्ये निवडीच्या रिंगणात आहेत.