
''महिला प्रबोधन''ला मालवण येथे प्रतिसाद
swt1314.jpg
75303
मालवणः शहरातील देऊळवाडा येथे आयोजित महिला प्रबोधन कार्यक्रमात नीना मुंबरकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले.
‘महिला प्रबोधन’ला
मालवण येथे प्रतिसाद
मालवण, ता. १३ः शहरातील देऊळवाडा येथे आयोजित महिला प्रबोधन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बॅ. नाथ पै सेवांगण संचालित कौटुंबिक सल्ला केंद्र आणि दिन दयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान मालवण पालिका द्वारा स्थापित जय भवानी वस्ती स्तर संघ देऊळवाडा व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमास जय भवानी वस्ती स्तर संघ देऊळवाडाच्या अध्यक्ष श्रीमती नीना मुंबरकर, संकल्प शहर मालवणच्या अध्यक्षा संजना मांजरेकर, पालिकेचे कोऑर्डिनेटर खेमराज सावंत, कौटुंबिक सल्ला केंद्राचे समुपदेशक मनोज कुमार गिरकर, विजय कुडाळकर हे उपस्थित होते. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर महिलांसाठी विविध फनी गेम्स घेण्यात आले. यातील विजेत्या महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. किरकर यांचा जय भवानी वस्ती स्तर संघ यांच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ आणि देऊन सुहास वालावलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सहयोगिनी सायली कांबळे यांनी केले.