शिक्षक डावरे यांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षक डावरे यांचे यश
शिक्षक डावरे यांचे यश

शिक्षक डावरे यांचे यश

sakal_logo
By

rat१३३०.txt

( पान ५ साठी, संक्षिप्त)

विज्ञान प्रदर्शनात शिक्षक डावरे यांचे यश

साखरपा ः कोसुंब इथे झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साखरपा केंद्र शाळा नं. १ चे शिक्षक उमेश डावरे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. शिक्षक गटातून शैक्षणिक साहित्यनिर्मिती गटातून डावरे यांनी हे यश मिळवले आहे. ५०वे संगमेश्वर तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शन श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसुंब येथे झाले. ''कृतीतून शिकू विज्ञान'' या शैक्षणिक साहित्यास जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मांडण्याची संधी मिळणार आहे. या साहित्यातून डावरे यांनी विज्ञानाशी निगडित संकल्पना, सूर्यमाला, श्वसनसंस्था, अन्नसाखळी, निवारा शोधणे, शरीराचे अवयव, ज्ञानेंद्रिय इत्यादी विशद केल्या आहेत. तिसरी ते पाचवीपर्यंतच्या विविध वैज्ञानिक संकल्पना कृती करून स्वयंअध्ययनातून शिकण्याची संधी या साहित्याच्या माध्यमातून मिळणार आहे. याशिवाय हे साहित्य हाताळण्यास सुलभ, आकर्षक आणि दीर्घकाळ टिकणारे आहे. विज्ञान प्रदर्शनात कोसुंब पंचक्रोशीतील शाळातील विद्यार्थ्यांनी भेट देऊन या साहित्यातून कृतीतून स्वयंअध्ययनाचा आनंद लुटला. यापूर्वी विज्ञान प्रदर्शनात जिल्हा व राज्यस्तरावर लोकसंख्या शिक्षण विषयाचे सादरीकरण केले आहे. शैक्षणिक साहित्यनिर्मितीमध्ये त्यापूर्वी यश संपादन केले आहे.
---

फोटो ओळी
- ratchl१३६.jpg ः
७५२४४
चिपळूण ः शिबिरात मार्गदर्शन करताना वैद्यकीय अधिकारी.
---
जिंदलतर्फे तोंडलीत मोफत आरोग्य तपासणी

चिपळूण ः तालुक्यातील तोंडली येथील सावंत माध्यमिक विद्यालय व ग्रामपंचायतीच्यावतीने विद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व चाचणी शिबिर घेण्यात आले. सामाजिक व आरोग्यक्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारी जिंदाल कंपनीच्या सौजन्याने हे शिबिर आयोजित केले होते. या प्रसंगी तोंडलीचे सरपंच मेघ सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक सावंत, सोसायटी अध्यक्ष रघुनाथ सावंत , ग्रामसेवक प्रकाश कदम, ज्येष्ठ नागरिक विठोबा सावंत, आरोग्यसेवक अनिकेत जाधव, आशासेविका सावंत उपस्थित होते. जिंदाल कंपनीमार्फत संजीवनी ट्रस्टचे डॉ. विकास कांबळे, डॉ. श्रद्धा शिंदे, डॉ. केतकी तरे, नर्स अपेक्षा, कीर्ती, फार्मासिस्ट भूषण, भूषण दळवी यांनी या शिबिरासाठी खूप मेहनत घेतली.
---
शिवाजी हायस्कूलमध्ये विवेकानंद जयंती

रत्नागिरी ः शहरातील झाडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे श्री स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी लेझिम व ढोलताशांच्या गजरात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली होती. शाळेत सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर हायस्कूलपासून परटवणे, मिरकरवाडा, मुरुगवाडा, श्रीदेव भैरी मंदिरमार्गे पुन्हा हायस्कूलपर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली. विविध महापुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. विद्यार्थी मनोगतात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती सांगण्यात आली. एम. डी. पाटील यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. डी.एन. पाटील यांनी सुत्रसंचालन केले.
---