
रत्नागिरी- सागर माझा सखा छायाचित्र प्रदर्शनाला प्रतिसाद
फोटो ओळी
-rat13p23.jpg-KOP23L75285
रत्नागिरी ः सागर महोत्सवानिमित्त गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात आयोजित छायाचित्र प्रदर्शन पाहताना विद्यार्थी.
सागर माझा सखा छायाचित्र प्रदर्शनाला प्रतिसाद
आजपर्यंत खुले ; जलचर, मासे, प्रवाळांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १३ ः अनेकविध समुद्री जीवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पाहण्यासाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात विद्यार्थी, नागरिकांची गर्दी झाली. आसमंत फाउंडेशन आयोजित पहिल्या सागर महोत्सवात समुद्र व त्यावरील विविध छायाचित्रांचे सागर माझा सखा हे प्रदर्शन विवांत अनटेम्ड फाउंडेशनने भरवले आहे.
या प्रदर्शनात जलचर, किनाऱ्यावर आढळणारे छोटे जीव, मासे, प्रवाळ आदींची विविध छायाचित्रे झळकली आहेत. हे प्रदर्शन उद्या (ता. १४) संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांना विनामूल्य पाहण्यासाठी खुले राहणार आहे.
सागर महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमास राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. सुनीलकुमार सिंह, प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, आसमंतचे प्रमुख संचालक नंदकुमार पटवर्धन, समीर डामरे आदी उपस्थित होते. मान्यवरांचा सत्कार पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन पटवर्धन यांनी केला. दीपप्रज्वलनाने सागर महोत्सवाचे उद्घाटन डॉ. सुनीलकुमार सिंह यांनी केले. आसमंतचे संचालक सीए नितीन करमरकर, सीए पुरुषोत्तम पेंडसे हे या वेळी उपस्थित होते. आरजे दुहिता सोमण-खेर यांनी सुरेख सूत्रसंचालन केले.
प्रास्ताविकामध्ये पटवर्धन यांनी सांगितले, आसमंतने गेल्या ११ वर्षात निसर्ग संवर्धन, विद्यार्थी आणि शास्त्रीय संगीत या विषयीचे अनेक कार्यक्रम केले आहेत. हा पहिला सागर महोत्सव आहे. या माध्यमातून समुद्राविषयी जनजागृती करण्याचे काम करत आहोत. डॉ. गुरूदास नुलकर यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साकारत आहे. प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी म्हणाले, समुद्र सखा आहे. त्यामुळे त्याला वाचवले पाहिजे. ही जबाबदारी मानवाचीच आहे. अनेक धातू, द्रव्ये, सुंदर जैवविविधता, जलचर प्राणी समुद्रात आहेत. विद्यार्थी व समुद्रकिनाऱ्यावर राहणाऱ्यांनी आणि सर्वांनीच समुद्र वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मान्यवरांचा सत्कार पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन नंदकुमार पटवर्धन यांनी केला. आरजे दुहिता सोमण-खेर यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी विवांत मुंबईचे डॉ. संजीव शेवडे, कोस्टल कॉन्झर्वेशन मुंबईचे प्रदीप पाताडे यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी, संशोधक पुणे, मुंबईसह विविध भागांतून आले आहेत.