नमन स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नमन स्पर्धा
नमन स्पर्धा

नमन स्पर्धा

sakal_logo
By

rat१३४२.txt

(पान ५ साठी)

मिरजोळे पाडावेवाडीत नमन स्पर्धा

रत्नागिरी, ता. १३ ः मिरजोळे, पाडावेवाडी येथे जिल्हास्तरीय नमन स्पर्धेचे आयोजन श्री माघी गणेशोत्सव मंडळ आणि कोकण नमन कलामंचने केले आहे. २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान माघी गणेशोत्सव साजरा होणार आहे.
गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाच्या संकटानंतर या वर्षीही माघी गणेशोत्सवानिमित्त पुन्हा जिल्हास्तरीय नमन स्पर्धा घेण्यात येणार आहे. सांस्कृतिक स्पर्धांच्या माध्यमातून कलाकार, लोककलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न मंडळातर्फे केला आहे. खेळ, नृत्य, ढोलवादन, नाट्य, भजन आणि पारंपरिक नमनकलेला स्पर्धेतून व्यासपीठ देण्यात येणार आहे. मर्यादित वेळेत ही कला सादर करायची आहे. स्पर्धेत १० नमन मंडळांचा सहभाग आहे. दर दिवशी दोन नमन मंडळांचे सादरीकरण होणार आहे.

माघी गणेशोत्सवानिमित्त २४ जानेवारीला श्रींचे आगमन, २५ ला सकाळी श्रींची प्रतिष्ठापना, सायंकाळी भजने, रात्री जिल्हास्तरीय नमन स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. २६ ला सायंकाळी भजन, २७ ला भजने, रात्री नमन सादरीकरण होईल. २८ ला सायंकाळी हळदीकुंकू, भजन व पुन्हा नमने होतील. २९ ला सकाळी रक्तदान व आरोग्य शिबिर, सायंकाळी भजने व दोन मंडळांचे नमन सादरीकरण होईल. ३० ला भजन व नमन होईल. ३१ ला श्री सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १ महाप्रसाद आणि रात्री ९ वा. नमन स्पर्धेचे बक्षिस वितरण होईल. यानंतर मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम रंगतील. १ फेब्रुवारीला सायं. ४ वा. श्रींची विसर्जन मिरवणूक निघेल. नमन व कार्यक्रमांचा आस्वाद घेण्याचे आवाहन मंडळातर्फे अध्यक्ष दीपक गावकर यांनी केले आहे.