चिपळूण -चाणक्य'' अभिनेते मनोज जोशी 15 जानेवारीला चिपळूणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण -चाणक्य'' अभिनेते मनोज जोशी 15 जानेवारीला चिपळूणात
चिपळूण -चाणक्य'' अभिनेते मनोज जोशी 15 जानेवारीला चिपळूणात

चिपळूण -चाणक्य'' अभिनेते मनोज जोशी 15 जानेवारीला चिपळूणात

sakal_logo
By

23L75350

अभिनेते मनोज जोशी
उद्या जानेवारीला चिपळुणात
चिपळूण, ता. १३ ः चतुरंगचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (ता. १५) होत आहे. ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना गौरवण्यात येणार आहे. मराठी-हिंदी-गुजराथी रंगभूमीवरील एक लोकप्रिय अभिनेते चिपळुणात येत आहेत. याचेच औचित्य साधून सिनेप्रेमी-नाट्यप्रेमी चिपळूणकरांसाठी मनोज जोशींच्या गप्पागोष्टींमय मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.
मनोज जोशींशी संवाद साधणार आहेत. चिपळुणातील निवेदिका, सूत्रसंचालिका मीरा पोतदार अभिनेते मनोज जोशी यांची मुलाखत घेणार आहेत. १९९०च्या सुमारास चाणक्यांची भूमिका खूपच गाजली होती. याशिवाय अनेक चित्रपट-मालिकांमधून विनोदी आणि खलनायकाच्या भूमिकेतील मनोज जोशी आजही वेगवेगळ्या भूमिकांतून आपली छाप पाडताना दिसतात. जोशी यांच्या गाजलेल्या भूमिका, नाटक-चित्रपट कारकिर्दीचा सुरवातीपासूनचा प्रवास अशा अनेक गोष्टींविषयी औत्सुक्यपूर्ण संवाद या मुलाखतीतून साधला जाणार आहे. त्यामुळे अशा अष्टपैलू अभिनेत्याला जवळून जाणून घेता येणार आहे. हा मुलाखतीचा कार्यक्रम रविवारी (ता. १५) जानेवारीला सायं. ६.३०वा. ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.