
स्वामी विवेकानंद, जिजाऊंना बांदा वाचनालयात अभिवादन
75341
बांदा ः नट वाचनालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करताना मान्यवर.
स्वामी विवेकानंद, जिजाऊंना
बांदा वाचनालयात अभिवादन
बांदा ः येथील नट वाचनालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांना जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक अनंत भाटे व श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे खजिनदार प्रा. भूषण सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वाचनालयचे सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक जगन्नाथ सातोसकर, अंकुश माजगावकर, प्रकाश पाणदरे, धोंडू फणशीकर, श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संचालक नीलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, अक्षय मयेकर, प्रवीण परब, स्वप्नीता सावंत, अर्चना सावंत, मिताली सावंत, ग्रंथपाल प्रमिला नाईक, सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते. यावेळी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊंचे महान विचार व आचरण श्री भाटे, प्रा. सावंत यांनी व्यक्त केले. राकेश केसरकर यांनी आभार मानले.
--------
दोडामार्गला फेब्रुवारीत कबड्डी लीग
दोडामार्ग ः सरगवे पुनर्वसन येथे येथील धर्मवीर छत्रपती श्री शंभूराजे प्रतिष्ठानतर्फे दोडामार्ग मर्यादित तालुकास्तरीय कबड्डी लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा १८ व १९ फेब्रुवारीला होणार आहेत. २४ ला अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने इच्छुक खेळाडूंनी तातडीने पवन चोर्लेकर यांच्याकडे नावनोंदणी करावी.