सूर्यकांत कुंभार यांना ‘सेंद्रिय शेतकरी’ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सूर्यकांत कुंभार यांना
‘सेंद्रिय शेतकरी’ पुरस्कार
सूर्यकांत कुंभार यांना ‘सेंद्रिय शेतकरी’ पुरस्कार

सूर्यकांत कुंभार यांना ‘सेंद्रिय शेतकरी’ पुरस्कार

sakal_logo
By

75451
सांगली : सूर्यकांत कुंभार यांना गौरविताना मान्यवर.

सूर्यकांत कुंभार यांना
‘सेंद्रिय शेतकरी’ पुरस्कार
कुडाळ ः नेचर केअर फर्टिलायझर्स विटा-सांगली या कंपनीच्या रौप्य वर्षानिमित्ताने गुरुवारी (ता. १२) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेरुर गावचे सुपुत्र सूर्यकांत उर्फ आप्पा कुंभार यांना सेंद्रिय शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मातीचे मोल जपणारे तपस्वी जयंत बर्वे व नेचर केअर फर्टिलायझर्स, विटा या कंपनीतर्फे देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण नुकतेच करण्यात आले. या कंपनीतर्फे महाराष्ट्रातील चार जणांना सेंद्रिय शेतकरी पुरस्कार देण्यात आला. यावेळी माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री अजित देशमुख, खासदार संजय पाटील, अनिल बाबर व मातीचे मोल जपणारे जयंत बर्वे आदी मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा झाला.
................
75440
मनोज मेस्त्री

तळेरेत आज ‘मधुर स्वर विमल’
तळेरे ः येथील ''संवाद परिवार'' आयोजित मकर संक्रांतीनिमित्त कणकवली येथील उगवते शास्त्रीय गायक मनोज मेस्त्री यांच्या ''मधुर स्वर विमल'' या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन संगीत मैफिलीचे आयोजन उद्या (ता. १५) सायंकाळी सातला येथील मधुकट्टा येथे केले आहे. मेस्त्री हे पं. डॉ. समीर दुबळे यांचे शिष्य असून त्यांचे महाराष्ट्रात विविध ठिकाणी गायनाचे कार्यक्रम झाले आहेत. संवाद परिवाराकडून दर महिन्याला साहित्य, कला विषयक एक उपक्रम आयोजित केला जातो. यापूर्वी मधुकट्ट्यावर डॉ. अरुणा ढ़ेरे, डॉ. अनिल अवचट, सुधीर सुखटणकर, डॉ. बाळ फोंडके, प्रा. प्रदीप पाटिल, वैजनाथ महाजन, प्रसाद कुलकर्णी अशा नामवंत साहित्यिकांचे कार्यक्रम झाले आहेत. या संगीत मैफलीत विश्रांती कोयंडे सहगायन करणार आहेत. तर संदीप पेंडूरकर (संवादिनी), रक्षानंद पांचाळ (तबला) शुभम राणे (तानपुरा), सागर महाडीक, वेदांत कुयेसकर (तालवाद्य) संगीत साथ करणार आहेत. या कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संवाद परिवाराने केले आहे.