द्रोण हजारेची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्रोण हजारेची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड
द्रोण हजारेची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

द्रोण हजारेची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

sakal_logo
By

rat13p4.jpg
75229
देवरूखः लहान कॅरमपटू द्रोण हजारे.
---------------
द्रोण हजारेची राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी निवड
साडवलीः महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनद्वारे ११ तारखेला घेण्यात आलेल्या ५६ व्या कॅरम स्पर्धेमध्ये साडवली पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलच्या द्रोण हजारे याने उत्तुंग यश प्राप्त करत राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. द्रोण हा सातवीमध्ये शिकत आहे. तालुकास्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत कॅरम स्पर्धेतील त्याची कामगिरी अतिशय उत्तमरित्या राहिली आहे. माजी आमदार सुभाष बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य प्रदिश कलंगडन यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
-----------
rat13p10.jpg
75222
खंडाळा (ता. रत्नागिरी) ः निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील विजेते विद्यार्थी.
-------------
वरवडे विद्यालयाचे यश
पावसः शरददादा बोरकर प्रतिष्ठान वरवडे आयोजित निबंध व वकृत्व स्पर्धेत माध्यमिक विद्यालय वरवडे भाग शाळा खंडाळा विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. यामध्ये निबंध स्पर्धेतील शालेय गटात श्यामली धनावडे, श्रुती जोशी, पूर्वा सुर्वे, महाविद्यालयीन गटात सौमित्र जोशी, सना चौगुले, साहिल बाचरे, वकृत्व स्पर्धेतील शालेय गटात नीलिमा धनावडे, ऋतिका कुटै, महाविद्यालयीन गटात मुक्ता खानविलकरने द्वितीय, हितेश रहाटेने तृतीय क्रमांक मिळवला. या विद्यार्थ्यांचे वरवडे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्याध्यापक जे. बी. देशमुख, यांनी अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांना सहाय्यक शिक्षक विश्वनाथ चिले यांनी मार्गदर्शन केले.
--------------
शिवाजी हायस्कूलमध्ये विवेकानंद जयंती
रत्नागिरी ः शहरातील झाडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे श्री स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी लेझिम व ढोलताशांच्या गजरात स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढली होती. शाळेत सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर हायस्कूलपासून परटवणे, मिरकरवाडा, मुरुगवाडा, श्रीदेव भैरी मंदिरमार्गे पुन्हा हायस्कूलपर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली. विविध महापुरुषांच्या वेशभूषेत विद्यार्थी या मिरवणूकीत सहभागी झाले होते. विद्यार्थी मनोगतात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती सांगण्यात आली. एम. डी. पाटील यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. डी. एन. पाटील यांनी सुत्रसंचालन केले.