ई-रिक्षा खरेदीची सखोल चौकशी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ई-रिक्षा खरेदीची 
सखोल चौकशी करा
ई-रिक्षा खरेदीची सखोल चौकशी करा

ई-रिक्षा खरेदीची सखोल चौकशी करा

sakal_logo
By

75487
बबन साळगावकर

ई-रिक्षा खरेदीची
सखोल चौकशी करा

साळगावकर ः बिले रोखण्याची मागणी

सावंतवाडी, ता. १४ ः पालिकेने शहरातील कचरा उचलण्यासाठी आणलेल्या ई-रिक्षा चालवताना एका बाजूने तोल जात असल्यामुळे एका गाडीला वापरा आधीच अपघात झाला आहे. त्यामुळे या गाड्यांच्या खरेदीची सखोल चौकशी करा. तसेच संबंधित पुरवठादार कंपनीचे बिल रोखून धरा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली.
याबाबत त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सावंतवाडी पालिकेने जलदरित्या कचरा उचलता यावा यासाठी घंटागाड्यांना पर्याय म्हणून ई-रिक्षा आणल्या; मात्र त्या चालवताना एका बाजूने तोल जात असल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. तर वापरात आणण्यापूर्वीच एका गाडीला अपघातही झाला. संबंधित गाड्या या निकृष्ट दर्जाच्या असून त्या जास्त काळ वापरात येऊ शकत नाहीत, हे प्रथमदर्शनी दिसते. यासाठी तब्बल १५ लाख निधी खर्चून सहा गाड्या आणल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांची सखोल चौकशी करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित पुरवठादार कंपनीचे बिल रोखून धरावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.