शिवसेनेचे हनु धुरी भाजपमध्ये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेचे हनु धुरी भाजपमध्ये
शिवसेनेचे हनु धुरी भाजपमध्ये

शिवसेनेचे हनु धुरी भाजपमध्ये

sakal_logo
By

75501
कोळंब कातवड ः शिवसेना शाखाप्रमुख हनू धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

शिवसेनेचे हनु धुरी भाजपमध्ये
मालवण : कोळंब-कातवडचे शिवसेना शाखाप्रमुख हनुमंत उर्फ हनु धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कोळंब ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना सरपंचासह ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता आली होती. त्यानंतर कातवड शाखाप्रमुख धुरी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भाजपामध्ये प्रवेश करत असल्याचे धुरी यांनी सांगितले. यावेळी गाव अध्यक्ष विनायक धुरी, उपाध्यक्ष विजय सारंग, ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, भाऊ फणसेकर, हेमंत परब, प्रसाद भोजणे, किशोर आचरेकर, अमित लोके, उमेश चव्हाण, दीपक कोरगावकर, हनुमंत चौगुले, सत्यवान लोके, कृष्णा चव्हाण, मोहन आचरेकर, नीलेश परब, समीर चव्हाण आदी उपस्थित होते.
..................
खासदार राऊत आज सिंधुर्गात
कुडाळ ः लोकसभा शिवसेना गटनेते शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत उद्या (ता. १५) सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणेः सकाळी ११ वाजता कलंबिस्त (ता. सावंतवाडी) येथे मालोबा चषक क्रिकेट स्पर्धेला भेट, सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त व पारपोली या गावातील ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य सत्कार कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी १२.३० वाजता सावंतवाडी येथून दिल्लीकडे प्रयाण (गोवा एअरपोर्ट).