सहाय्यता कक्षातर्फे 155 मुलांचा 2डी इको

सहाय्यता कक्षातर्फे 155 मुलांचा 2डी इको

Published on

rat1432.txt

बातमी क्र.32 (पान 3 साठी)

फोटो-
rat14p27.jpg-
75546
रत्नागिरी- राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालगटासाठी मोफत 2 डी इको तपासणी शिबिराला जिल्हा रुग्णालयात गर्दी झाली.
---

सामंत वैद्यकीय कक्षातर्फे मोफत तपासणी शिबिर

22 मुलांवर मुंबईत होणार मोफत शस्त्रक्रिया; जिल्ह्यातून प्रतिसाद

रत्नागिरी, ता. 14 : जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्यासंर्भातील उत्तम सेवा मिळावी, यासाठी गेले काही महिने पालकमंत्री उदय सामंत झटत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत बालगटासाठी मोफत टू डी इको तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात 155 बालकांची टू डी इको केल्यानंतर यातील 22 मुलांच्या सर्जरीचा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्‍यांनी दिला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालय आणि मुंबईतील एसआसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पीटल यांच्या माध्यमातून हे शिबीर पार पडले. मंत्री सामंत यांच्या वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत हे नियोजन करण्यात आले. या शिबिरासाठी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून म्हणजे मंडणगडपासून राजापूरपर्यंतच्या 9 तालुक्यातील अनेक पालक आपल्या मुलांना तपासणीसाठी घेऊन आले होते. वैद्यकीय मदत कक्षाच्यावतीने पालकांना मार्गदर्शन, नोंदणीपर्यंत सर्व मदत करण्यात आली, अगदी पाण्यापासून नाष्टा, जेवणापर्यंतच्या सुविधा पुरवण्यात आल्या. जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे, असे मानत आरोग्य सहाय्य कक्षाच्यावतीने मागील सहा महिन्यात हे दुसरे शिबिर आयोजित करण्यात आले. 0 ते 18 वर्ष वयोगटातील तपासणीसाठी आलेल्या मुलांपैकी 155 जणांची 2डी इको तपासणी केली. त्यातील 22 जणांच्या सर्जरीसाठी डॉक्टरांनी सूचना केली. मुंबईतील एसआसीसी चिल्ड्रन्स हॉस्पीटलतर्फे या मुलांवर टप्प्याटप्प्याने मोफत सर्जरी केली जाणार आहे. काल सकाळी सुरू झालेली ही तपासणी सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयात सुरु होती. मंत्री सामंत वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे महेश सामंत, सागर भिंगारे व त्यांचे सहकारी यासाठी मेहनत घेतली. प्रत्येक तालुका पातळीवर या शिबिराची माहिती देण्यात आली होती. या शिबिराचे अनौपचारीक उद्घाटनही करण्यात आले नाही. रुग्णांची सेवा हेच ब्रीद घेऊन मंत्री सामंत वैद्यकीय सहाय्यता कक्ष काम करीत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्यासह मुंबईतून आलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षितीज शेठ आणि अमित केळकर यांचे आभार मानण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com