रत्नागिरी- तायक्वॉंदो स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- तायक्वॉंदो स्पर्धा
रत्नागिरी- तायक्वॉंदो स्पर्धा

रत्नागिरी- तायक्वॉंदो स्पर्धा

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१५p२.jpg- rat१५p२
रत्नागिरी : विभागीय शालेय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी सहभागी होणारा रत्नागिरी जिल्ह्याचा चमू.
-------------
शालेय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी
रत्नागिरीतील खेळाडू रवाना
रत्नागिरी, ता. १५ : शालेय विभागीय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी रत्नागिरीतून खेळाडू साताऱ्याला रवाना झाले. ही स्पर्धा सोमवारपासून (ता. १६) १८ जानेवारीपर्यंत चालणार आहे. स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकाविलेल्या खेळाडूंची निवड कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वॉंदो स्पर्धेसाठी झाली आहे. श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात स्पर्धा होणार आहेत.
जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय स्पर्धा डेरवण येथे झाली होती. याकरिता रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशन व शाहनूर चिपळूण तालुका तायक्वॉंदो अॅकॅडमीचे सहकार्य लाभले होते. साताऱ्यात होणाऱ्या स्पर्धेसाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली या पाच जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत.
रत्नागिरीतील आद्या कवितके, राधिका जाधव, त्रिशा मयेकर, गायत्री शेलार, गौरी विलणकर, सई सावंत, अमेय सावंत, सार्थक चव्हाण, मृदुला पाटील, आदीष्टी काळे, ऋत्विक तांबे, समर्था बने, कृपा मोरये, देवन सुपल, श्रेयस वाडेकर, संस्कृती केतकर हे खेळाडू सहभागी होत आहेत. या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, जिल्हा संघटना अध्यक्षा, राज्य संघटना सदस्य व्यंकटेश्वरराव कररा, जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, तालुका समन्वयक मुश्ताक आगा यांनी शुभेच्छा दिल्या. या सर्व खेळाडूंना शाहरुख शेख, प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत यांचे मार्गदर्शन लाभले आहे.