कडाक्याच्या थंडीत बेघरांना मायेची उब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कडाक्याच्या थंडीत 
बेघरांना मायेची उब
कडाक्याच्या थंडीत बेघरांना मायेची उब

कडाक्याच्या थंडीत बेघरांना मायेची उब

sakal_logo
By

75643
पुणे ः बेघर लोकांना ऊबदार कपड्यांचे वाटप करताना कोकण कला संस्थेचे पदाधिकारी.

कडाक्याच्या थंडीत
बेघरांना मायेची उब

‘कोकण कल’तर्फे कपडे, ब्लॅंकेटचे वाटप

बांदा, ता. १५ ः सध्या कडाक्याची थंडी सुरू असून पुणे शहराचा पारा देखील ८ अंशाच्या खाली घसरला आहे. अशा थंडीत पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करून शहरात कामासाठी आलेले परप्रांतीय कामगार राहण्यासाठी घर नसल्याने रात्री रस्त्याच्या कडेलाच राहतात. या लोकांना थंडीत मायेची उब मिळावी, यासाठी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्यावतीने मुंबई व पुणे शहरांत ऊबदार कपडे, चादरी, चटया तसेच ब्लॅंकेटचे वाटप केले. संस्थेतर्फे दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येतो.
गारठवणाऱ्या ऐन थंडीत कामगारांची अनेक कोवळी मुले पाय पोटात घेऊन कुडकुडत झोपलेली असतात. अशा थंडीमुळे कित्येक मुले सर्दी, ताप, श्‍वसनविकार, दमा, कोरडा खोकला अशा अनेक विषाणूजन्य आजारांनाही बळी पडतात. अशा आजारांपासून रस्त्यावरील लोकांना वाचविण्यासाठी आणि थंडीत त्यांच्या मुलांना मायेची ऊब देण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या भागांत कोकण कला व शिक्षण विकास संस्था ऊबदार कपड्यांचे वाटप करते. यंदाही हा उपक्रम झाला. मुंबईतील सूरज कदम, साक्षी पोटे, बिना अहिरे, ऋतुजा पवार आणि योगिता निजामकर, तर पुणे येथे विशाल महांगरे, आरती भोज, पूनम सुतार आणि श्वेता जैन सहभागी झाले.