पन्नास वर्षात प्रसारित केलेल्या तंत्रज्ञानाचे कौतूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पन्नास वर्षात प्रसारित केलेल्या तंत्रज्ञानाचे कौतूक
पन्नास वर्षात प्रसारित केलेल्या तंत्रज्ञानाचे कौतूक

पन्नास वर्षात प्रसारित केलेल्या तंत्रज्ञानाचे कौतूक

sakal_logo
By

फोटो ओळी
-rat१५p१०.jpg -KOP२३L७५६५४
सिल्लोड : कृषी प्रदर्शनात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या स्टॉलवर माहिती घेताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील व कृषि मंत्री अब्दुल सत्तार.
----------
५० वर्षातील प्रसारित तंत्रज्ञानाची सिल्लोडमध्ये मुद्रा
-----
कोकण कृषी विद्यापीठ ; ८०० चौरस मीटर क्षेत्रावर मांडणी
दाभोळ, ता. १५ : सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथे सिल्लोड कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने मांडलेले प्रदर्शन सर्वांचे लक्ष वेधणारे ठरले. गेल्या पन्नास वर्षात दापोली विद्यापीठाचे प्रसारित केलेले तंत्रज्ञान एकूण ८०० चौरस मीटर क्षेत्रावर मांडण्यात आले.
चारही विद्यापीठाच्या प्रदर्शनांचा विचार करता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे प्रदर्शन हे कौतुकाचे व लक्षवेधी ठरले. या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली, विद्यापीठातील विविध शास्त्रज्ञ आणि कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. चौरस मीटर क्षेत्रावर मांडण्यात आले. यामध्ये सर्व पिकांचे वाण, कंदपिके, भाजीपाला पिके, अवजारे, खेकडा पालन, जिवंत मासे आणि लाखीबागेची प्रितीकृती यांचा अंतर्भाव करण्यात आला. पाच दिवस चाललेल्या या महोत्सवाला राज्यातून १२ लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून विद्यापीठाच्या प्रदर्शन दालनाचे कौतुक केले. पहिल्याच दिवशी दीड लाख शेतकऱ्यानी विद्यापीठाच्या प्रदर्शनाला भेट दिली. गेल्या पन्नास वर्षात दापोली विद्यापीठाचे प्रसारित केलेले तंत्रज्ञान एकूण ८०० चौरस मीटर क्षेत्रावर मांडण्यात आले.
या कृषि महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पालकमंत्री संदीपान भुसरे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, सहकारमंत्री अतुल सावे, खासदार इम्तियाज जलील, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.
महोत्सव काळात विद्यापीठाच्या दालनाला राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, सर्व कृषि विद्यापीठाचे कुलगुरू, वेगवेगळ्या विभागातील आमदार आणि विद्यापीठ कार्यकारिणी सदस्यांनी भेट दिली.