
पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद
rat१५१३.txt
(पान २ साठी)
फोटो ओळी
-rat१५p१३.jpg-
७५६७२
चिपळूण ः तपासणी शिबिरा प्रसंगी लाईफकेअर हॉस्पिटलचे डॉ. समीर दळवी, संदेश यादव, डॉ. शाहिद परदेशी.
----
पत्रकारांच्या आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद
चिपळूण, ता. १६ ः पत्रकार हा समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी झटत असतो. हे करताना स्वतःच्या प्रकृतीकडे नेहमीच दुर्लक्ष होत असते. कोरोना काळामध्ये माध्यमात करणारे पत्रकार व सहकाऱ्यांना अनेक जटील समस्यांना तोंड दयावे लागले होते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे सामाजिक दायित्व समजून येथील लाईफकेअर हॉस्पिटलने मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतले.
शिबिरात सीबीसी, रक्तातील साखरेच्या पातळीची तपासणी, युरिया, क्रिएटिन, युरिन रुटीन, लिपिड प्रोफाईल, ब्लड ग्रुप, पीएफटी, ईसीजी, ब्लडप्रेशर, डोळ्यांची तपासणी या चाचण्या करण्यात आल्या. हॉस्पिटलच्या वतीने आयोजित शिबिरात डॉ. नदीम खतीब यांनी डोळ्यांची तपासणी केली. डॉ. शोएब खतीब यांनी चेकअप केले. डॉ. प्राची दिलवाले आणि डॉ. प्राची हरवंदे यांनी पत्रकारांची तपासणी तसेच आरोग्यविषयक शंकाचे निरसन केले. या वेळी लाईफकेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. इसहाक खतीब, डॉ. समीर दळवी, डॉ. नदीम खतीब, संदेश यादव, डॉ. प्राची दिलवाले, डॉ. शाहिद परदेशी, अभिजित सुर्वे उपस्थित होते.