कुसुरचे पोलिस पाटील एक वर्षासाठी निलंबित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुसुरचे पोलिस पाटील 
एक वर्षासाठी निलंबित
कुसुरचे पोलिस पाटील एक वर्षासाठी निलंबित

कुसुरचे पोलिस पाटील एक वर्षासाठी निलंबित

sakal_logo
By

कुसूरचे पोलिसपाटील
एक वर्षासाठी निलंबित
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १५ ः कुसूरचे पोलिसपाटील रवींद्र सूर्याजी साळुंखे यांना प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी एक वर्षाकरिता निलंबित केले आहे. कामकाजात टाळाटाळ केल्याची त्यांच्या विरोधात तक्रार होती. कुसूर-सुतारवाडी येथील संदीप शंकर सुर्वे यांनी साळुंखे यांच्याविरोधात ३० सप्टेंबर २०२१ ला प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती. गावातील काही लोकांशी हातमिळविणी करून गावात जातीयवादी राजकारण करणे, गावात शंकास्पद वातावरण तयार करणे, गावातील लोकशाही, स्वातंत्र्य, समता या मूल्यांची पायमल्ली पोलिसपाटील करीत असल्याची तक्रार सुर्वे यांनी केली होती. यासंदर्भात साळुंखे यांची चौकशी सुरू होती. दरम्यान, वैभववाडी तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांच्या अहवालानुसार प्रांताधिकारी राजमाने यांनी पोलिस पाटील साळुंखे यांना एक वर्षाकरिता निलंबित केले आहे.