
साडवली-मार्लेश्वर यात्रेसाठीच्या जादा गाड्यांचा भाविकांना लाभ
फोटो ओळी
-rat15p24.jpg-KOP23L75790 मार्लेश्वर ः मार्लेश्वर यात्रेनिमित्त भाविकांना मोफत पाणी वाटप करण्यात आले.
-----------
मार्लेश्वर यात्रेसाठी जादा गाड्यांचा भाविकांना लाभ
साडवली, ता. १५ : श्री क्षेत्र मार्लेश्वराच्या कल्याणविधी सोहळ्यासाठी भाविकांना ने-आण करण्यासाठी देवरूख एसटी आगाराने एसटीची व्यवस्था केली होती. आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूख-मार्लेश्वर मार्गावर जादा बस सोडण्यात आल्या. साखरपा, संगमेश्वर, चिपळूण, खेड आदी बसस्थानकातून फेऱ्या सोडण्यात आल्या. पार्किंग ते पायथा या दरम्यान बसफेर्या सोडल्याने भाविकांना त्याचा चांगला फायदा झाला. यात्रोत्सवात श्री मार्लेश्वर सेवा संघ व आंगवली सोनारवाडी येथील शामकांत अणेराव-वासुदेव तांबे कुटुंबीयांच्या वतीने भाविकांना मोफत पाणी वाटप, आंगवली मधलीवाडीतील अणेराव बंधू यांच्यातर्फे मोफत लाडू वाटप करण्यात आले. मारळ येथील श्री मार्लेश्वर विश्वकर्मा सेवा मंडळातर्फे मोफत सरबत वाटप करण्यात आले. मंडळाच्या वतीने गेली ४० वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दाभोळे ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने आरोग्य तपासणी करण्यात आली. आरडीसीसी बॅंकेने आपली एटीएम व्हॅन मारळ नगरीत ठेवली होती.
--------