आज 27 विद्यार्थी रवाना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज 27 विद्यार्थी रवाना
आज 27 विद्यार्थी रवाना

आज 27 विद्यार्थी रवाना

sakal_logo
By

पान १ साठी

जिल्ह्यातून २७ विद्यार्थी
आज जाणार इस्त्रो भेटीसाठी
संशोधक वृत्ती वाढीसाठी जिल्हा परिषदेचा उपक्रम
गावतळे, ता. १५ ः जाणू विज्ञान, अनुभवू विज्ञान, या उपक्रमांतर्गत इस्त्रो भेटीसाठी निवडलेल्या जिल्ह्यातील २७ विद्यार्थ्यांचा प्रवास सोमवारी (ता. १६) सुरू होईल. तेथे भारतीय अवकाश संशोधन संस्थेला ते भेट देणार आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधक निर्माण होण्याची इच्छा जागृत व्हावी, या उद्देशाने जिल्हा परिषदेने इस्त्रो, नासा भेटीचा उपक्रम हाती घेतला होता. तो जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी उचलून धरला. पालकमंत्री उदय सामंत यांनीही जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून दिला. विद्यार्थी निवडीसाठी घेतलेल्या परीक्षेमध्ये २३ हजार विद्यार्थी बसले होते. बीट, केंद्र, तालुका, जिल्हास्तरावर परीक्षा झाल्या. त्यामधून २७ विद्यार्थी निवडले गेले. त्यातील इस्त्रो भेटीचा दौरा सोमवारी होणार आहे. नियोजनानुसार ते रत्नागिरी ते पणजी मोटारीने, तर पणजी ते बंगळूर विमानाने विद्यार्थी २.५० ते ४.५ प्रवास करणार आहेत. बंगळूर येथे हॉटेल रिझेंटा येथे मुक्काम करून १७ जानेवारीला सकाळी सर विश्वेश्वरय्या म्युझियमची पाहणी करून दुपारी बगळूरहून त्रिवेंद्रमला विमानाने प्रवास करणार. रात्री मुक्काम करून १८ जानेवारीला विक्रम साराभाई स्पेस सेंटर, इस्त्रोला रॉकेट लॉंचर पाहणी, स्पेस म्युझियम पाहणी करून परतीचा प्रवास करणार आहेत. २० रोजी सकाळी ९ वाजता ते परतील. या २७ विद्यार्थ्यांचा इस्त्रो दौरा होणार असून, आजच सर्व रवाना झाले.
विद्यार्थ्यांबरोबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी. यादव, शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, मुरकुटे जाणार आहेत. दापोलीतील धनश्री जाधव, तनिष्का बोधगावकर आणि सुयश गोसावी या विद्यार्थ्यांना विस्तार अधिकारी सुनील सावंत, रामचंद्र सांगडे, कल्याणी मुळ्ये आणि नोडल ऑफिसर बळीराम राठोड यांनी शुभेच्छा देत रत्नागिरीसाठी रवाना केले. जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि शिक्षण विभाग सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.