
कसाल येथे शिबिरात 58 जणांचे रक्तदान
७५९४७
कसाल येथे शिबिरात
५८ जणांचे रक्तदान
ओरोस ः कसाल येथील श्री सिद्धिविनायक मंदिरचा ४१ वा वर्धापनदिन आणि माघी गणेश जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ५८ जणांनी रक्तदान केले. कसाल येथील सिद्धिविनायक मंदिरात प्रतिवर्षी माघी गणेश जयंती उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यानिमित्त शुक्रवारी (ता. १६) रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात एकूण ५८ जणांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन कसाल सरपंच राजन परब यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी मंडळाचे उमेश पावसकर, अवधूत मालणकर, अरुण मालणकर, माजी सरपंच नीलेश कामतेकर, ग्रामपंचायत सदस्य चिन्मय पावसकर, मंडळाचे वैभव कर्पे, जिल्हा रक्तपेढी वैद्यकीय अधिकारी, भाऊ मर्तल, लवू म्हाडेश्वर तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. रक्तदानाचे हे नववे वर्ष आहे. शिबिर यशस्वीतेसाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.