क्रिकेट स्पर्धा

क्रिकेट स्पर्धा

Published on

rat१६२९.txt

(पान ५ साठी)

फोटो ओळी
-rat१६p२४.jpg-
७५९३८
रत्नागिरी ः क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र घाग, धरमसीभाई चौहान, बापू बिर्जे, रोहन वरेकर आदी.
---
महापुरुष क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

रत्नागिरी ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक किरण उर्फ भैय्या सामंत आणि युवा नेते केतन उमेश शेट्ये यांच्या वाढदिवसानिमित्त कोकणनगर येथे श्री महापुरुष क्रिकेट स्पर्धा होत आहे. या स्पर्धेचे उद्घाटन रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष राजेंद्र घाग यांच्या हस्ते करण्यात आले. कोकणनगर येथील श्री महापुरुष मित्रमंडळ, क्रीडामंडळाने स्पर्धांचे आयोजन केले आहे. या प्रसंगी प्रभाग क्र. ४ चे माजी नगरसेवक मुसाभाई काझी, उद्योजक इलियास खोपकर, रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य धरमसिंग भाई चौहान, नदीम सय्यद प्रमुख उपस्थित होते. या वेळी श्री महापुरुष मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष बापू बिर्जे, मुख्य आयोजक रोहन वरेकर यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. स्पर्धेसाठी बुधाजी पवार, मोहन पाटील, राजू महाकाळ, सायली निवेंडकर, चैतन्य इप्ते, हर्षद सुर्वे, दादू किड्ये, अभी मोरे, संजोग म्हेतर, प्रेम महाकाळ, विराज कुमठेकर, शरीफ शहा, रोहन मोरे, ओंकार निब्दे आदी मान्यवर उपस्थित होते.
---
वक्तृत्व स्पर्धेत पूजा परमार तृतीय

रत्नागिरी ः मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचा उडान महोत्सव देवरूख येथील आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालयात घेण्यात आला. या महोत्सवात देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालयाची द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेच्या पूजा इंद्रमल परमार हिने तृतीय क्रमांक मिळवला. या महाविद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांनी पथनाट्य, पोस्टर मेकिंग, वक्तृत्व व सर्जनशील लेखन या चार स्पर्धेत सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्याचे अभिनंदन संस्था पदाधिकारी, प्रभारी प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, डीएलएलई विभागप्रमुख प्रा. दीप्ती कदम, प्रा. विनय कलमकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले.
---

रामपूरच्या राममंदिरात हरिनाम सप्ताह

चिपळूण ः तालुक्यातील रामपूर गुढेफाटा येथील राम मंदिराच्या प्रांगणात अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सुरू आहे. चिपळूण-गुहागर तालुक्यातील भाविक दररोज वेगवेगळ्या होणाऱ्या कीर्तनांचा आस्वाद घेऊन मंत्रमुग्ध होत आहेत. मंगलमय वातावरणात भक्तीची पर्वणी साधत आहेत. पहाटे काकड आरती, ८ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, रात्री ७.३० ते ९.३० कीर्तनाचा लाभ भाविक घेत आहेत. दुपारी कीर्तन सोहळ्यानंतर महाप्रसाद होत आहे. २० जानेवारीस काल्याचे कीर्तन होणार आहे. गुहागर-चिपळूण परिसर अखंड हरिनाम सप्ताह संयोजक समितीचे अध्यक्ष रामचंद्र पवार, सचिव राजाराम मोरे, खजिनदार प्रकाश निवळकर, ओघवत्या भाषेत सूत्रसंचालन करणारे प्रमोद निवळकर मेहनत घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com