चिपळूण ः प्रवासात हेल्मेट परिधान अत्यावश्यक साधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः  प्रवासात हेल्मेट परिधान अत्यावश्यक साधन
चिपळूण ः प्रवासात हेल्मेट परिधान अत्यावश्यक साधन

चिपळूण ः प्रवासात हेल्मेट परिधान अत्यावश्यक साधन

sakal_logo
By

फोटो ओळी
- ratchl162.jpg ः 3L75982 चिपळूण ः रामपूर येथे झालेल्या जनजागृती अभियानात सहभागी आरटीओ कार्यालयाचे अधिकारी.
---------------
प्रवासात हेल्मेट अत्यावश्‍यक

मोटारवाहन निरीक्षक मोरे ; रामपुरात जनजागृती अभियान
चिपळूण, ता. १६ ः दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट परिधान करणे अत्यावश्यक आहे. हेल्मेटचा संरक्षणासाठी वापर केला पाहिजे. रस्त्यावर जर अपघात झाला तर प्रथमोपचारासाठी मदत आवश्यक असल्याचे प्रतिपादन मोटारवाहन निरीक्षक आश्विनकुमार मोरे यांनी रामपूर येथील कार्यक्रमात केले.
तालुक्यातील रामपूर येथील मिलिंद हायस्कूलमध्ये ''सडक सुरक्षा, जीवन सुरक्षा, रस्ता सुरक्षा'' अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाहने चालवताना सुरक्षाविषयक नियमांचे पालन करायला हवे. वेगावर नियंत्रण ठेवायला हवे. मनावर नियंत्रण ठेवून वाहने चालवल्यास फारसे अपघात होत नसल्याचे सांगितले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, ओम मोटार ट्रेनिंग स्कूल, पडवळ मोटर ट्रेनिंग स्कूल, श्रीया मोटर ट्रेनिंग स्कूल यांनी या अभियान कार्यक्रमात योगदान दिले. ओम मोटार ट्रेनिंग स्कूलचे प्रमुख संदेश कातकर यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. सहाय्यक निरीक्षक सानप, रामपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विलास चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. सहसेक्रेटरी सुरेश साळवी, संचालक डॉ. राजेंद्र चव्हाण, मुख्याध्यापिका नलावडे, पर्यवेक्षक वीरकर आणि विद्यार्थी उपस्थित होते.