
डिजिटल मार्केटिंगमध्ये युवकांना चांगली संधी
rat१६३७.txt
(पान २ साठी)
फोटो ओळी
-ratchl१६३.jpg ः
७५९८३
चिपळूण ः कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. सुनील भादुले.
----
डिजिटल मार्केटिंगमध्ये युवकांना चांगली संधी
निनाद डाकवे ; डीबीजे महाविद्यालयात कार्यशाळा
चिपळूण, ता. १६ ः आजच्या डिजिटल युगात आपला व्यवसाय वाढवण्याकरिता व आपली ओळख तयार करण्याकरिता डिजिटल मार्केटिंग हा एक आधुनिक मार्ग आहे. काळानुसार मार्केटिंगचे अनेक नवीन मार्ग येत आहेत व डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करण्याकरिता युवकांना चांगली संधी आहे. या संधीचे सोने करण्यासाठी त्यांनी तयार असले पाहिजे, असे मत निनाद डाकवे यांनी व्यक्त केले.
येथील डीबीजे महाविद्यालय प्लेसमेंट व करिअर गाइडंस सेल, माहिती व तंत्रज्ञान विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत निनाद डाकवे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, आजच्या आधुनिक युगात भारतात इंटरनेटचा वापर खूप वाढत आहे. त्यामुळे ऑनलाइन मार्केटिंगचा पर्याय ही युवकांनी संधी समजून त्याचा फायदा करावा, डिजिटल मार्केटिंगकडे एक करिअर म्हणून पाहावे. त्यासाठी नवीन माध्यमांचा अभ्यास करायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले. माहिती व तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. सुनील भादुले यांनी सर्वांचे स्वागत केले. त्याप्रमाणे महाविद्यालयत याकरिता लवकरच Incubation Center सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास रजिस्ट्रार अनिल कलकुटकी, प्रा. अमित शेवडे, प्रा संजय शिंदे, प्रा. सायली सुर्वे, प्रा. चित्रा गोंजार, प्रा. पूजा शिंदे, प्रा. सबा लांडगे उपस्थित होते.