सिंधुदुर्ग स्वच्छतेत आदर्शवत करूया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्ग स्वच्छतेत आदर्शवत करूया
सिंधुदुर्ग स्वच्छतेत आदर्शवत करूया

सिंधुदुर्ग स्वच्छतेत आदर्शवत करूया

sakal_logo
By

swt1624.jpg
76017
विलवडेः स्वच्छता मोहिमेत सहभागी शासकीय-निमशासकीय कर्मचारी, महिला, विद्यार्थी व ग्रामस्थ.

सिंधुदुर्ग स्वच्छतेत आदर्शवत करूया
रामचंद्र दळवीः विलवडेत स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. १६ः स्वच्छता अभियानाची सुरुवात आपले घर, गावापासून केल्यास देश स्वच्छ व्हायला वेळ लागणार नाही. ''स्वच्छ गाव, सुंदर गाव, हरित गाव'' ही संकल्पना गावागावांत राबवून सिंधुदुर्ग जिल्हा स्वच्छतेमध्ये आदर्शवत करूया, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे सचिव रामचंद्र उर्फ आबा दळवी यांनी विलवडे येथे केले.
सावंतवाडी तालुक्यातील विलवडे या कृषिप्रधान गावात एस. आर. दळवी फाउंडेशन मुंबई आणि विलवडे ग्रामपंचायत यांच्य़ा माध्यमातून ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव, हरित गाव’ संकल्पनेचा प्रत्यक्ष कृतीसह प्रारंभ करण्यात आला. स्वच्छता व प्रदूषण निर्मूलनाबाबत जनजागृती करताना गावाने एकत्रितपणे आज स्वछता मोहीम राबविली. संपूर्ण गावातील मुख्य व अंतर्गत सर्व रस्त्यांच्या दुतर्फा, दोन्ही धरणे व ओहोळ, नदीकाठचा परिसर, मंदिरे, शाळा तसेच प्रत्येक वाडीवर फिरून ओला व सुका कचऱ्यासह प्लास्टिक, लोखंडाचे तुकडे, काचा गोळा करण्यात आल्या. राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असलेले दळवी फाउंडेशन ही संस्था शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे. शिक्षक, महिला तसेच समाजात वावरत असताना दुर्लक्षित घटकांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेत आहे. विलवडे गावचे सुपुत्र आबा दळवी यांच्या संकल्पनेतून आता ही संस्था राज्यस्तरावर स्वच्छता व प्रदूषण निर्मूलनाबाबत प्रत्यक्ष कृतीसह जनजागृती करणार आहे. याची सुरुवात आज विलवडे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्यातून विलवडे गावातून केली. आजपासून बुधवारपर्यंत सलग तीन दिवस ही स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वच्छता व प्रदूषण निर्मूलनाच्या या जागरात ग्रामस्थांसह महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. या मोहिमेत गावातील प्लास्टिकसह ओला व सुका कचरा तसेच विघटन न होऊ शकणाऱ्या वस्तू व धातू गोळा करण्यात येत आहेत. हा उपक्रम गावात कायमस्वरुपी सुरू राहण्यासाठी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ तसेच सर्व प्रकारच्या कचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मोहिमेच्या प्रारंभ प्रसंगी आबा दळवी, प्रकाश दळवी यांनी उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर सर्वांना स्वच्छता व प्रदूषण निर्मूलनाबाबत शपथ देण्यात आली. यावेळी महेश गवस, संतोष जगधणे, अजय वर्मा, विश्वनाथ पुरी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष महेश सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय गावडे, तुषार आरोसकर, उपसरपंच विनायक दळवी उपस्थित होते.