रत्नागिरी ः गिलनेटवाल्यांना बांगडी माशाचा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः गिलनेटवाल्यांना बांगडी माशाचा आधार
रत्नागिरी ः गिलनेटवाल्यांना बांगडी माशाचा आधार

रत्नागिरी ः गिलनेटवाल्यांना बांगडी माशाचा आधार

sakal_logo
By

गिलनेटवाल्यांना बांगडी माशाचा आधार

वाऱ्याचा अडथळा कायम; पहाटे वेग कमी
रत्नागिरी, ता. १६ ः किनारपट्टी परिसरात ताशी २० किमी वेगाने वारे वाहत असल्यामुळे रत्नागिरीतील मासेमारीत अडथळा निर्माण झाला आहे; परंतु पहाटेच्या सुमारास वाऱ्‍याचा वेग कमी असल्याने त्याचा फायदा छोट्या मच्छीमारांना होत आहे. किनारी भागात गिलनेटवाल्यांना बांगडी मासा मिळत असल्याने मच्छीमारांना दिलासा मिळत आहे.
उत्तरेकडून वेगवान वारे वाहत असून त्याबरोबरच कोकणात थंडीचा कडाका वाढला आहे. दिवसाही गारवा जाणवत आहे. त्याचा परिणाम मासेमारीवर झालेला आहे. किनारी भागात दिवसभर वारे वाहत असल्यामुळे समुद्राच्या पाण्याला प्रचंड करंट आहे. खोल समुद्रात वादळसदृश परिस्थिती आहे. मोठ्या नौकांनी बंदरातच नांगर टाकणे पसंत केले आहे.
दापोली, राजापुरातील काही नौका जयगड बंदरात आल्या आहेत. रत्नागिरीतील अनेक छोट्या-मोठ्या मच्छीमारांनी मासेमारीला जाणे टाळले आहे. मासेमारीवरच उदरनिर्वाह चालत असल्यामुळे गिलनेटने मासेमारी करणारे छोटे मच्छीमार वाऱ्‍याचा वेग कमी झाला की, समुद्रावर स्वार होतात. गेले आठ दिवस ही परिस्थिती आहे. काळबादेवी ते मिऱ्‍या परिसरातील अनेक मच्छीमार किनारी भागात मासेमारीला जात आहेत. त्यांना छोटा बांगडी मासा मिळत आहे. एका नौकेला दोन ते तीन जाळी मासे मिळतात. एका जाळीत सुमारे ३० किलो मासा मिळतो. किलोला ३० रुपये दर आहे. त्यामध्ये काही फिशमिलसाठी वापरण्यात येणारी बांगडीही मिळत आहे. त्याला किलोला १५ रुपये मिळत आहे. सध्या बांगडीवरच मच्छीमारांचा जोर आहे.


कोट
वाऱ्‍याचा आणि थंडीचा परिणाम मासेमारीवर झाला आहे आहे. अनेक मच्छीमारांनी बंदरात थांबणे पसंत केले आहे. वाऱ्‍याचा वेग कमी झाला की, मासेमारीला नौका रवाना होतात.
- श्रीदत्त भुते, मच्छीमार