चिपळुणात सेवानिवृत्त वीजकर्मचार्‍यांचे पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळुणात सेवानिवृत्त वीजकर्मचार्‍यांचे पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू
चिपळुणात सेवानिवृत्त वीजकर्मचार्‍यांचे पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू

चिपळुणात सेवानिवृत्त वीजकर्मचार्‍यांचे पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू

sakal_logo
By

rat१६४७.txt

(पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat१६p४१.jpg ः
७६०३६
चिपळूण ः चिपळूण महावितरण कार्यालय गेटजवळील सेवानिवृत्त वीज कर्मचार्‍यांच्या बेमुदत आंदोलनाची माहिती देताना दिलीप आंब्रे.
---
सेवानिवृत्त वीजकर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू

चिपळूण, ता. १६ ः चिपळूण विभागांतर्गत सेवानिवृत्त तांत्रिक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतरचे अंतिम उपदान व रजा रोखीकरणाची सर्व रक्कम मिळावी यासाठी येथील सेवानिवृत्त वीज कर्मचारी संघटनेने पुन्हा बेमुदत आंदोलन छेडले आहे. आजपासून येथील महावितरण कार्यालयाच्या गेटजवळ या आंदोलनाला सुरवात झाली आहे.
आज (ता.१६) सकाळी महावितरण कंपनीच्या गेटवर प्रचंड घोषणा देत सेवानिवृत्त वीज कर्मचारी यांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनामागचा उद्देश सेवानिवृत्त वरिष्ठ व्यवस्थापक प्रकाशगड मुंबई तथा प्रतिनिधी, सेवानिवृत्त वीज कर्मचारी संघटनेचे दिलीप आंब्रे यांनी स्पष्ट केला. चिपळूण विभागांतर्गत सेवानिवृत्त तांत्रिक कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरचे अंतिम उपदान व रजा रोखीकरणाची रक्कम अदा करताना त्यांच्या प्रशासकीय अज्ञानाचा फायदा घेऊन जाणीवपूर्वक व हेतूपुरस्सर एकूण ७६ सेवानिवृत्त कर्मचाऱ्‍यांना अंदाजित २ कोटी २५ लाख रक्कमेच्या फसवणुकीविरुद्ध कर्मचाऱ्‍यांनी एकजुटीने आंदोलन पुकारले होते. त्याची दखल घेऊन उपदानाची व रजा रोखीकरणाची रोख रक्कम १ कोटी ५२ लाख रुपये कर्मचाऱ्‍यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर जमा करावयाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार १८ ते २२ नोव्हेंबर २०२२ ला एकूण ३३ सेवानिवृत्त कर्मचाऱ्‍यांना वैयक्तिक बँक खात्यामध्ये एकूण ९२ लाख ५ हजार ४८१ रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे. १६ ते २० डिसेंबर २०२२ला २२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्‍यांना वैयक्तिक बँक खात्यामध्ये २७ लाख ६१ हजार ६३१ रु. रक्कम जमा करण्यात आली आहे. ३० डिसेंबर २०२२ ला कळवण्यात आले आहे की, एकूण २२ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे एकूण ४९ लाख ४८ हजार २०३ रु. प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होऊन सांघिक कार्यालयामध्ये निधीची मागणी करण्यात आली असून ४ जानेवारी २०२३ पासून कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक बँक खात्यामध्ये रक्कम जमा होत आहे; मात्र अजूनही एकूण ५८ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे एकूण अंदाजित रक्कम ७३ लाख रुपये अधिक दंडात्मक व्याज प्रशासनाकडून येणे बाकी आहे. त्यामुळे ती रक्कम मिळावी यासाठी हे आंदोलन केले जात असल्याची माहिती आंब्रे यांनी दिली. न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे.

---