मुडेश्‍वर मैदान जमीन मोजणीस आक्षेप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुडेश्‍वर मैदान जमीन मोजणीस आक्षेप
मुडेश्‍वर मैदान जमीन मोजणीस आक्षेप

मुडेश्‍वर मैदान जमीन मोजणीस आक्षेप

sakal_logo
By

76052
कणकवली ः मुडेश्‍वर मैदानातील जमीन मोजणीवेळी काही काळ वादंग झाला होता. (छायाचित्र ः अनिकेत उचले)

मुडेश्‍वर मैदान जमीन मोजणीस आक्षेप

स्टेडिअमसाठी आरक्षण; उपनगराध्यक्ष मालकांशी संवाद साधणार

कणकवली, ता. १६ ः शहरातील मुडेश्‍वर मैदान परिसरातील जमीन मोजणीला आज माजी नगरसेवक उमेश वाळके आणि काही जमीन मालकांनी विरोध केला. त्‍यानंतर मोजणी प्रक्रिया थांबविली. पुढील काळात जमीन मालकांशी संवाद साधून पुन्हा जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू केली जाईल, अशी माहिती उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली.
शहरातील स्टेडियम आरक्षण विकसित करण्यासाठी नगरपंचायतीतर्फे आज मुडेश्‍वर मैदान परिसरात जमीन मोजणीला प्रारंभ करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे, माजी नगरसेवक उमेश वाळके, भूमी अभिलेखच्या रोशनी मठकर, मंडळ कृषी अधिकारी धीरज तोरणे, नगरपंचायतचे मनोज धुमाळे, वनरक्षक अविनाश राठोड, सुमित कुबल, नगरपंचायतीचे अभियंता सचिन नेरकर, नगरपंचायत तांत्रिक सल्‍लागार श्री. मांडवे, जमीन मालक सदानंद राणे, संतोष राणे आदी उपस्थित होते. जमीन मोजणी सुरू असताना त्‍याला उमेश वाळके, संतोष राणे आदींनी आक्षेप घेतला. स्टेडियमसाठी पहिल्‍या टप्प्यात २५० गुंठे जागा ताब्‍यात घेतली जात आहे; मात्र सध्या जेथे मैदान आहे, ते वगळून दुसरीच जागा संपादीत होत असल्‍याचा आरोप वाळके, राणे यांनी केला. या मुद्यावर वाळके, राणे यांनी उपनगराध्यक्ष हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगरपंचायतचे तांत्रिक सल्‍लागार मांडवे यांच्याशी वाद घातला. यावेळी तावडे, हर्णे यांनी जमीन मालकांच्या अडचणी म्‍हणणे ऐकून घेतले. त्‍यानंतर आजच्या दिवसापुरती जमीन मोजणी थांबविली. पुढील काळात जमीन मालकांशी संवाद साधून पुन्हा जमीन मोजणी केली जाणार असल्‍याची माहिती श्री. हर्णे यांनी दिली.