Wed, Feb 8, 2023

दोन मोटारींच्या धडकेत
मणेरीत वाहनांचे नुकसान
दोन मोटारींच्या धडकेत मणेरीत वाहनांचे नुकसान
Published on : 16 January 2023, 3:17 am
76062
मणेरी ः येथे दोन मोटारींची समोरासमोर धडक झाली.
दोन मोटारींच्या धडकेत
मणेरीत वाहनांचे नुकसान
दोडामार्ग, ता. १६ ः मणेरी येथे दोडामार्ग-बांदा राज्यमार्गावर एका अवघड वळणावर आज दोन मोटारींची समोरासमोर धडक बसून अपघात झाला. यात दोन्ही मोटारींच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
यातील मारुती सुझुकी मोटार बांद्याच्या दिशेने जात होती. तर वॅगनार मोटार दोडामार्गच्या दिशेने येत होती. मणेरी येथील तिलारी नदीच्या पुलालगत असलेल्या एका अवघड वळणावर या दोन्ही मोटारींची समोरासमोर धडक झाली. धडकेनंतर मारुती सुझुकी थेट गटारात गेली. या अपघातात वॅगनारची समोरील लाईट फुटली. शिवाय दोन्ही मोटीरांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची कोणतीही तक्रार येथील पोलिस ठाण्यात दाखल नव्हती.