Sun, Jan 29, 2023

कांदळगाव सडा येथे
वाळूचा साठा पकडला
कांदळगाव सडा येथे वाळूचा साठा पकडला
Published on : 16 January 2023, 4:09 am
76114
कांदळगाव ः येथील वाळूसाठ्यावर कारवाई करण्यात आली.
कांदळगाव सडा येथे
वाळूचा साठा पकडला
मालवण, ता. १६ : अनधिकृत वाळू उत्खनन, वाहतूक व वाळू साठा यावर तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात धडक कारवाई सुरूच आहे. आज सायंकाळी कांदळगाव सडा या ठिकाणी अनधिकृत वाळू साठा महसूल पथकाने सील केला. पंचनामा व प्राथमिक तपासणीत हा वाळूसाठा ३० ब्रास असल्याची माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली आहे. पंचांसमोर वाळू साठा सील करून कांदळगाव पोलीस पाटील यांच्या ताब्यात ठेवण्यात आला आहे. तर जमीन मालक यांना नोटीस बजावण्याची कार्यवाही उद्या ता. १७ रोजी केली जाणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले.