वेंगुर्लेकर महाविद्यालयात सांस्कृतिक उपक्रम उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेकर महाविद्यालयात सांस्कृतिक उपक्रम उत्साहात
वेंगुर्लेकर महाविद्यालयात सांस्कृतिक उपक्रम उत्साहात

वेंगुर्लेकर महाविद्यालयात सांस्कृतिक उपक्रम उत्साहात

sakal_logo
By

swt174.jpg
76133
पणदूरः वेंगुर्लेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध ‘डेज’चे आयोजन केले होते.

वेंगुर्लेकर महाविद्यालयात
सांस्कृतिक उपक्रम उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ः पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयात सांस्कृतिक विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध डेजचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंद द्विगुणित केला.
यामध्ये पिंक डे, जीन्स डे, कॅप डे, ब्लॅक अँड व्हाईट डे, गोल्डन इरा डे, टेलिव्हिजन डे, चॉकलेट डे, सारी डे, टाय डे, वेस्टर्न डे, मिसमॅच डे, ट्रॅडिशनल डे साजरे करण्यात आले. या दरम्यान रॅम्प वॉक व विविध फनी गेम्सही घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रीयन परंपरा, वारकरी, विठ्ठल रखुमाई, पेशवे, साऊथ इंडियन, कोळी अशा विविध वेषभूषा करून रोमहर्षक ट्रॅडिशनल डे साजरा केला. यावेळी संस्था कार्याध्यक्ष शशिकांत अणावकर, सचिव डॉ. अरुण गोडकर, प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यानिमित्त ढोल-ताश्यांच्या गजरात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयापासून पणदूर तिठा येथील सिंधुदुर्ग बँक ते शिवाजी इंग्लिश स्कूल अशी दिंडी काढून शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर तिठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले. महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ''तिळगूळ घ्या व गोड बोला'' हा आनंददायी संक्रांतीचा सण साजरा करून या कॉलेज डेजची सांगता करण्यात आली. हा उपक्रम सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. सचिन वासकर यांच्या नियोजनातून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने व सहभागाने झाला. कार्यक्रम नियोजनपूर्वक पार पाडल्याबद्दल प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे यांनी कौतुक केले