नियम पाळा; अपघात टाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नियम पाळा; अपघात टाळा
नियम पाळा; अपघात टाळा

नियम पाळा; अपघात टाळा

sakal_logo
By

76203
कुडाळ ः वॉकेथॉन रॅली सांगता कार्यक्रमात सहभागींना प्रमाणपत्र देताना नंदकिशोर काळे, साईराज जाधव, अभय सामंत आदी. (छायाचित्र ः अजय सावंत)


नियम पाळा; अपघात टाळा

नंदकिशोर काळे ः कुडाळमध्ये ‘वॉकेथॉन’ रॅलीची सांगता

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १७ ः सध्या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांत मोठी वाढ झाली आहे. रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांना वाहनांद्वारे धडक होण्याचे प्रमाण वाढले असून यात अनेकांचा नाहक बळी जातो. प्रत्येकाने वाहने चालविताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी आज येथे ‘वॉकेथॉन’ रॅली सांगता कार्यक्रमात केले. यावेळी रॅलीत सहभागी १४२ जणांना प्रमाणपत्रे देण्यात आली. यामध्ये ‘गिअरअप पिंगुळी’च्या युवा वर्गाचा मोठा सहभाग होता.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२३ अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (सिंधुदुर्ग) यांच्यातर्फे ‘गिअरअप पिंगुळी’, रोटरी क्लब कुडाळ, लायन्स क्लबच्या सहकार्याने वॉकेथॉन रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी लायन्स पदाधिकारी सीए सुनील सौदागर, अॅड. अजित भणगे, श्रीनिवास नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रणजित देसाई, लायन्स अध्यक्ष अॅड. समीर कुलकर्णी, मेघा सुकी, अस्मिता बांदेकर, स्नेहा नाईक, गिअरअपचे संचालक साईराज जाधव, सामाजिक कार्यकर्ते हेमंत जाधव, अभय सामंत, दीपक गावडे, पंकज गावडे, विशाल कदम, ऋषिकेश महाजन, केतन चव्हाण, प्रथमेश चूडनाईक, अविनाश वालावलकर, डॉ. शेरावती शेट्टी, अॅड. तेजाली भणगे, सुवर्णा गावडे, विनायक पिंगुळकर, शोभा माने, प्रमोद भोगटे, ओंकार पडते आदी उपस्थित होते. ही रॅली हॉटेल आरएसएन येथून सुरू करण्यात आली. त्यानंतर एस. एन. देसाई चौक (संत राऊळमहाराज महाविद्यालय), गवळदेव ते कुडाळ हायस्कूलमार्गे पोलिस ठाणे, बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, हॉटेल गुलमोहर, एस.टी. आगार मार्गे सेवारस्त्याने पुन्हा हॉटेल आरएसएन अशी काढण्यात आली.
---
रॅलीत शेकडोंचा सहभाग
यावेळी काळे यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालल्यामुळे समोरून येणारे वाहन दिसते. त्यामुळे अपघात होणार नाहीत. अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी रस्ता सुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन केले. दरम्यान या रॅलीत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. सहभागी सर्व नागरिकांना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. तर ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.