रस्सीखेच खेळातून एकजुटीचे दर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्सीखेच खेळातून एकजुटीचे दर्शन
रस्सीखेच खेळातून एकजुटीचे दर्शन

रस्सीखेच खेळातून एकजुटीचे दर्शन

sakal_logo
By

swt1719.jpg
76218
निरवडेः स्पर्धेचे उद्घाटन करताना प्रमोद गावडे. बाजूला बबन साळगावकर, सुहानी गावडे, अर्जुन पेडणेकर, चंद्रकांत गावडे, दशरथ मल्हार आदी.

रस्सीखेच खेळातून एकजुटीचे दर्शन
बबन साळगावकर ः निरवडेत स्पर्धेचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ः एकजुटीने लढल्यानंतर हमखास यश मिळते. रस्सीखेच हे एकजुटीचे प्रतीक असून हे या स्पर्धेच्या माध्यमातून दिसून येत आहे. या खेळ प्रकाराकडे तरुणाई वळत असून ही कौतुकाची गोष्ट आहे, असे मत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी मांडले. मोबाईलच्या जमान्यात मुलांना मैदानी स्पर्धांकडे वळविणे गरजेचे आहे. निरवडे महापुरुष मंडळाच्या माध्यमातून हे काम सुरू असून हे अभिमानास्पद आहे, असेही त्यांनी सांगितले. निरवडे येथील महापुरुष कला, क्रीडा मंडळाच्या माध्यमातून रस्सीखेच स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष अर्चना घारे परब, सावंतवाडी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, सरपंच सुहानी गावडे, राष्ट्रीय खेळाडू अर्पिता राऊळ, निरवडे उपसरपंच अर्जुन पेडणेकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, डिजिटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, पत्रकार अनंत जाधव, हरिश्चंद्र पवार, राजू तावडे, नीलेश परब, भुवन नाईक, निरवडे ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार, जयराम जाधव, आनंदी पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप पांढरे, सुभाष मयेकर, संजय तानावडे, नामदेव गावडे, पोलिस पाटील अजित वैद्य, नयनेश गावडे, अमित राऊळ यांच्यासह ग्रामस्थ आणि खेळाडू उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय खेळाडू अर्पिता राऊळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. निरवडे गावचे सुपुत्र रस्सीखेच स्पर्धेतील उत्कृष्ट फ्रंटमॅन ताता गावडे यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. निरवडे गावच्या नवनिर्वाचित सरपंच गावडे, उपसरपंच पेडणेकर यांनीही सन्मानित करण्यात आले.
यावेळी साळगावकर यांनी महापुरुष मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. अशाच पध्दतीने तरुणाईने पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक असलेले सहकार्य आम्ही नक्कीच करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. सरपंच गावडे यांनी मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. रस्सीखेच खेळ हा एकजूट दाखवून देतो. एकत्र आल्यानंतर आपल्याला कोणी हरवू शकत नाही. एक काठी कोणीही मोडू शकतो, मात्र काठीची जुडी कोणी मोडू शकत नाही. रस्सीखेच हा खेळ प्राचीन काळापासून देश-विदेशात खेळला जात होता; त्याला म्हणावे तसे पाठबळ मिळाले नाही, असे सांगितले. प्रमोद गावडे यांनी मंडळाने अशा प्रकारचे उपक्रम राबविल्याबद्दल कौतुक केले. यापुढे एक पाऊल पुढे टाकून रक्तदानासारखे सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी मी त्यांच्या नेहमीच पाठीशी राहीन, अशी ग्वाही दिली. सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले. आभार चंदन गोसावी यांनी मानले.