डाव्होसमध्ये राज्याला मिळाली 45 हजार 900 कोटींची गुंतवणूक

डाव्होसमध्ये राज्याला मिळाली 45 हजार 900 कोटींची गुंतवणूक

Published on

rat१७१०.txt


( पान २ साठी मेन)

फोटो ओळी
-rat१७p१५.jpg-
७६१८१
मुंबई- स्वित्झर्लंड येथील डाव्होसमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक सामंजस्य करार झाले.
--

राज्यात होणार ४६ हजार कोटींची गुंतवणूक

उदय सामंत ; १० हजार प्रत्यक्ष रोजगार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः स्वित्झर्लंड येथील दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाले. सामंत म्हणाले, दावोस येथे आज मुख्यमंत्री शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले आहे. त्यांनी येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली. महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन घडवले जाणार असून महत्वाच्या उद्योगांसमवेत येथे सामंजस्य करारही केले जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून सुमारे १० हजार तरुणांच्या हाताला काम मिळणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. या वेळी, प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशिष नवडे, स्टीफन उपस्थित होते.
--
यांच्याशी झाला सामंजस्य करार
१. Greenko energy Projects १२ हजार कोटींची गुंतवणूक
२. Berkshire Hathaway Home Services १६ हजार कोटींची गुंतवणूक
३. ICP Investments/ Indus Capital १६ हजार कोटींची गुंतवणूक
४. Rukhi foods ४८० कोटींची गुंतवणूक
५. Nipro Pharma Packaging India . १६५० कोटींची गुंतवणूक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com