
कसब्यात प्राचीन मंदिर परिसराची स्वच्छता
rat१७३७.txt
बातमी क्र. ३७ ( पान ५ साठी)
फोटो ओळी
-rat१७p२९.jpg -
७६२४८
कसबा ः संगमेश्वर येथील प्राचिन मंदिर परिसराची स्वच्छता करताना सर्व शंभूपाईक.
----
कसब्यात प्राचीन मंदिर परिसराची स्वच्छता
जिल्ह्यातील सर्व शंभूपाईकांची मोहीम
साडवली, ता. १७ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून छावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे विद्यमान अध्यक्ष सुनील धावडे यांच्या नेतृत्वाखाली काल रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शंभूपाईक एकत्र येवून त्यांनी कसबा संगमेश्वर येथील प्राचिन मंदिर परिसराची स्वच्छता केली.
रत्नागिरीतील छावा प्रतिष्ठानच्या शिलेदारांकडून जिल्ह्यातील विविध किल्ले संवर्धन, संरक्षण तसेच किल्यांवर स्वच्छता अभियान राबवणे असे उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या माध्यमातून दवाखाने, विविध धार्मिक स्थळे व समाजोपयोगी उपक्रम असणाऱ्या ठिकाणी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात येते. हे अभियान यशस्वी करण्यासाठी छावा प्रतिष्ठानचे पदाधिकारी सचिव समीर गोताड, संघटक समीर धावडे, खजिनदार संगम धावडे, प्रवक्ता नितिन रोडे, सदस्य मुकेश धावडे, चंद्रकांत गोताड, गणेश कांबळे, संदेश धावडे, प्रशांत कांबळे, प्रथमेश कांबळे, प्रवीण रोडे यांचे सहकार्य मिळाले.
--