
साटवलीतील दारूधंद्यावर धाड, एकजण ताब्यात
rat१७४४.txt
(पान ५ साठी)
साटवलीतील दारूधंद्यावर छापा
लांजा, ता. १७ ः तालुक्यातील साटवली भंडारवाडी येथे दारूधंद्यावर धाड टाकून विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या एकाला लांजा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोमवारी रात्री ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये १८ लिटरची गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, साटवली भंडारवाडी येथे हरकिसन आंबोळकर हा संशयित विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लांजा सहाय्यक पोलिस निरीक्षक तेजस्विनी पाटील यांच्यासह उपनिरीक्षक प्रशांत जाधव तसेच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भालचंद्र रेवणे, महिला पोलिस हवालदार कस्तुरी गुरव, महिला पोलिस नाईक सुगंधा दळवी यांच्या पथकाने काल सायंकाळी साटवली भंडारवाडी येथे छापा टाकला. या वेळी हरकिसन हा १८ लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह मिळून आला. लांजा पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे त्याच्यावर कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
----------------