मालवण काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी ताजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालवण काँग्रेस अल्पसंख्याक 
विभागाच्या अध्यक्षपदी ताजर
मालवण काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी ताजर

मालवण काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी ताजर

sakal_logo
By

76283
सरदार ताजर

मालवण काँग्रेस अल्पसंख्याक
विभागाच्या अध्यक्षपदी ताजर
मालवण : तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभाग अध्यक्षपदी सरदार ताजर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांची जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांच्या कार्यालयात संघटना वाढीबाबत शेख यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. तालुक्यातील अल्पसंख्याक बांधवांना एकत्रित करून लवकरच कार्यकारिणी बनविणार असल्याचे ताजर यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, संदेश कोयंडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, आनंद परुळेकर, पल्लवी तारी-खानोलकर, मेघःश्याम लुडबे, महेंद्र मांजरेकर, देवानंद लुडबे, जेम्स फर्नांडीस, लक्ष्मीकांत परुळेकर, पराग माणगावकर, योगेश्वर कुर्ले, महिला तालुकाध्यक्षा ममता तळगावकर, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर, शोभना चिंदरकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
................
रेडी येथे २२ ला ‘विसावा’चा प्रारंभ
मालवण : रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री शांताराम प्रभुझांट्ये ट्रस्ट अनुदानित व रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर संचलित ‘विसावा’ या नवीन संकल्पनेचा प्रारंभ रविवारी (ता. २२) सायंकाळी चारला रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, रेडी (ता. वेंगुर्ले) येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, मानव साधन विकास संस्था चेअरपर्सन उमा प्रभू, गोव्याचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विशाल परब आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विवेक रेडकर, श्री शांताराम प्रभुझांट्ये ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश झांट्ये यांनी केले आहे.